'हम आपके हैं कौन' चे संगीतकार राम लक्ष्मण यांचं निधन

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 मे 2021

बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'मैंने प्यार किया' आणि 'हम आपके हैं कौन' सारख्या चित्रपटांमध्ये हिट गाणी देणारे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रामलक्ष्मण आता आपल्यात राहिले नाहीत.

मुंबई: बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 'मैंने प्यार किया' आणि 'हम आपके हैं कौन' सारख्या चित्रपटांमध्ये हिट गाणी देणारे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रामलक्ष्मण आता आपल्यात राहिले नाहीत. आज शनिवारी सकाळी त्यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. रामलक्ष्मण हे काही काळापासून आजारी होते, त्यांनी नागपूर येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले  आहे. यात हिंदीव्यतिरिक्त मराठी आणि भोजपुरी चित्रपटांचाही समावेश आहे.(Famous musician Ram Laxman passes away)

राम लक्ष्मण यांचे खरे नाव विजय पाटील होते. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्यांनी कोविड -19 लसीचा दुसरा डोस घेतला होतe, अशी माहिती रामलक्ष्मण यांच्या मुलाने माध्यमांना दिली. प्रसिद्द गायिका लता मंगेशकर यांनीही रामलक्ष्मण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून लिहिले- 'मला नुकतेच कळले, अत्यंत जाणकार व लोकप्रिय संगीतकार रामलक्ष्मण जी (विजय पाटील) यांचे निधन झाले आहे. हे ऐकून मला वाईट वाटले ते खूप छान व्यक्तीमत्व होते. मी त्यांची बरीच गाणी गायली जी खूप लोकप्रिय झाली. नम्र आदरांजली.'

नॅशनल क्रश रश्मिकाने शेअर केले बालपणीचे फोटो 

रामलक्ष्मण यांच्या मुख्य चित्रपटांमध्ये 'मैंने प्यार किया', 'पत्थर के फूल', '100 दिवस', 'प्रेम शक्ती', 'मेघा', 'तराना', 'हम आपके हैं कौन' आणि 'हम साथ साथ हैं' यासारखे काही खास चित्रपट आहेत. यापूर्वी रामलक्ष्मण 'लक्ष्मण' म्हणून ओळखले जात होते. राम त्याच्याबरोबर जोडीला होते आणि हिंदी चित्रपटात राम-लक्ष्मण एकत्र संगीत देत होते. 1997 मध्ये 'एजंट विनोद' या चित्रपटात गायल्यानंतर संगितकार राम यांच अचानक निधन झालं. यानंतर लक्ष्मण यांनी रामलक्ष्मण म्हणूनच त्याचे पूर्ण नाव ठेवून आपल्या संगित कार्याला ओळख दिली.

संबंधित बातम्या