धक्कादायक! नवं गाणं प्रदर्शित होण्या अगोदरच प्रसिध्द गायकाची 'एक्झिट'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध गायक दिलजान याचे आज निधन झाले आहे. आज मंगळवारी पहाटे 3.45 मिनिटांनी गायकाचा मृत्यू झाला.

चंदिगड: प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजानाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रसिद्ध गायक दिलजान याचे आज निधन झाले आहे. आज मंगळवारी पहाटे 3.45 मिनिटांनी गायकाचा मृत्यू झाला. असं म्हटलं जात आहे की या सिंगरचा मृत्यू एका अपघातात झाला. सिंगरच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे.

दिलजान पहाटेच कारने अमृतसरहून करतापूरला जात होता, तेव्हाच जंडियाला गुरुजवळ हा अपघात झाला आणि या अपधातात त्याचा मृत्यू झाला. दिलजान करतारपूर येथील रहिवासी होता, त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कार डिवायडरला  धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

वृत्तानुसार, अमृतसर-जालंधर जीटी रोडवरील जंडियाला गुरु पुलाजवळ दिलजनाची कार डिवायडरवर आदळून त्यांचा मृत्यू झाला. आता पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रवाना केला आहे.

हा अपघात कशामुळे झाला याचा तपास केला जात आहे. मंगळवारी पहाटे दिलजन आपल्या कारमध्ये अमृतसरहून करतापुरच्या दिशेने जात होता, असं बोललं जात आहे की त्यांची कार वेगात होती आणि पुलाजवळ येताच कारचे नियंत्रण सुटले आणि डिवायडरला धडकल्याने ती पलटी झाली. या अपघातानंतर दिलजानला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले मात्र  प्रवासातच त्याचा मृत्यू झाला होता.

दिलजानचे नवीन गाणे 2 एप्रिल रोजी रिलीज होणार होते. सोमवारी यासंदर्भात, तो एका मिटींगसाठी अमृतसरला गेला होता, तेथून परत येत असताना ही घटना घडली. ज्या वेळेस हा अपघात झाला त्यावेळी दिलजान कारमध्ये एकटा होता. अशा परिस्थितीत दिलजन यांच्या निधनामुळे चाहते खूप दुःखी झाले आहेत. सोशल मीडियावर चाहते या गायकाला वेगवेगळ्या प्रकारे आठवत आहेत. आपल्या छोट्या कारकीर्दीत दिलजनने बरीच उत्तम गाणी सादर केली होती.

Vakeel Saab Trailer: एखाद्या अभिनेत्याचं फॅन्सला किती वेड असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ 

संबंधित बातम्या