प्रसिध्द भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन

प्रसिध्द भजन गायक नरेंद्र चंचल यांचे निधन
Copy of Gomantak Banner (36).jpg

प्रसिद्ध गायक नरेंद्र चंचल यांचे आज दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ते गंभीर आजारी होते आणि दिल्लीच्या सरिता विहारमधील हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर आज दुपारी 12.30 वाजता नरेंद्र चंचल यांनी वयाच्या 80 व्य़ा वर्षी अखेरचा श्वास घेतला. नरेंद्र चंचल यांच्या निधनानंतर फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित कलाकारांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

नरेंद्र चंचल यांनी त्यांच्या अनोख्या शैलीच्या गायकीने सर्वांच्या हृदयात स्थान मिळवले होते. त्यांची अनेक भजने श्रोत्यांच्या मुखी होती. त्यातील एक अतिशय प्रसिध्द म्हणजे चलो बुलावा आया है, माताने बुलाया है, प्यारा सजा है ही भजने कमालीची लोकप्रिय झाली होती. अमृतसर येथे जन्मलेले नरेंद्र चंचल नंतर दिल्ली येथे स्थायिक झाले होते. त्यांनी देशासोबतच परदेशात देखील भजनाच्या माध्यमातून नाव कमवले होते. त्याशिवाय अमिताभ बच्चन यांच्यापासून ते राजकपूर यांच्यासाठीच्या चित्रपटांकरिता त्यांनी गाणी गायली होती.  

नरेंद्र चंचल हे लाईव्ह परफॉर्मन्ससाठीही प्रसिध्द होते. त्यांच्या निधनानंतर कलाविश्वामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गायक दिलेर मेहेंदी यांनी सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे नरेंद्र चंचल यांचे निधन झाल्याची माहिती दिली. तसेच गायक नरेंद्र चंचल यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आपल्याला प्रचंड दु:ख झाल्याचे दिलेर मेहेंदी यांनी आपल्या या ट्विट पोस्ट मध्ये म्हटले आहे. त्यानंतर भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने देखील ट्विटरवरून नरेंद्र चंचल यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.    

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com