'इतनी शक्ती हमें देना दाता'च्या गीतकाराचे कर्करोगामुळे निधन

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

 'इतनी शक्ती हमें देना दाता'चे गीतकार अभिलाष यांचे कर्करोगाने निधन झाले. अभिलाष हे दीर्घकाळापासून कर्करोगाशी कडवी झुंज देत होते.

 मुंबई- विद्यार्थ्यांमधील लोकप्रिय प्रार्थना गीत 'इतनी शक्ती हमें देना दाता'चे गीतकार अभिलाष यांचे कर्करोगाने निधन झाले. अभिलाष हे दीर्घकाळापासून कर्करोगाशी कडवी झुंज देत होते.

मार्च महिन्यातच त्यांच्या पोटातील एका गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती खराब होती. गोरेगावमध्येच काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 अभिलाष यांनी लिहिलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत. 'इतनी शक्ती हमें देना दाता' याशिवाय सांज भर गई आजा, आज की रात न जाना, वह जो खत मोहब्बत में,  तुम्हारी याद सागर में, संसार इक नदिया, तेरे बिना सुना मेरे मन का मंदिर अशी त्यांची गाणी आजही आवर्जून ऐकली जातात.

आपल्या चार दशकांच्या कारकीर्दीत त्यांनी गाण्यांबरोबरच अनेक चित्रपट व मालिकांचे लेखनही केले. अदालत, धूप छाँव, दुनिया रंग रंगीली, अनुभव, संसार, चित्रहार, रंगोली अशा अनेक लोकप्रिय शोजचे त्यांनी लेखन केले. गीतलेखन आणि पटकथा लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 

    

संबंधित बातम्या