रजनीकांतने लस घेतल्याचा चाहत्यांना होतोय फायदा

दैनिक गोमंतक
गुरुवार, 13 मे 2021

रजनीकांतने कोरोना लस घेतल्याची माहिती रजनीकांतची मुलगी सौंदर्या रजनीकांत यांनी आज दिली आहे.

सध्या देशात कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, एकीकडे संक्रमित लोकांची (Covid19 Patients) संख्या वाढत आहे, तर  दुसरीकडे लसीकरण देखील सुरू आहे. आत्तापर्यंत कोरोनाविरूद्ध लसीकरण (Vaccination) मोहिमेत लाखो लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. या यादीमध्ये, सामान्य लोकांपासून ते सेलेब्रिटी (Celebrity) मंडळींचा समावेश आहे. आता या यादीमध्ये प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत यांचा सुद्धा समावेश झाला आहे. मात्र रजनीकांत यांच्या लसीकरणांनंतर एक मोठा फायदा होणार आहे. (Fans are benefiting from Rajinikanth's vaccination)

Radhe Movie: राधे इफ्केट, झी 5 चा सर्व्हर क्रॅश, प्रेक्षकांनी भाईजानला मारली हाक

दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत यांनी कोरोना लस घेतल्याची माहिती रजनीकांतची मुलगी सौंदर्या रजनीकांत यांनी आज दिली आहे. 'आपल्या थलाईवाला वॅक्सीन मिळाली आहे. चला आपण मिळून लढूया आणि कोरोना विरुद्धची लढाई जिंकूया' असं ट्विट करत सौंदर्य यांनी चाहत्यांना रजनीकांतने लस घेतल्याची माहिती दिली आहे. मात्र रजनीकांतने लसीकरण केल्यानंतर एक विशेष बाब समोर आली आहे. 

कोरोना लसीबद्दल अनेक ठिकाणी  वेगवेगळे गैरसमज पसरलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लोक लसीकरणापासून दूर पळताना दिसत आहेत. मात्र आता रजनीकांत यांनी लास घेतल्यानंतर त्यांच्या लाखो चाहत्यांना लसीवर विश्वास निर्माण झाला असून ते सुद्धा लस घेतील अश्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरून समोर येताना दिसत आहेत. 

संबंधित बातम्या