
गेले कित्येक दिवस टोकाची उत्सुकता लागुन राहिलेला शाहरुखचा पठाण अखेर रिलीज झाला, आणि शाहरुखच्या फॅन्समध्ये त्याची किती क्रेज आहे हेही दिसलं.शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आणि सर्व विरोधानंतर अखेर आज 25 जानेवारी रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
'पठाण' चित्रपटाबाबत जेवढा बहिष्कार आणि विरोध झाला आहे, तेवढाच उत्साह त्याच्या चाहत्यांनी अॅडव्हान्स बुकिंगमध्ये दाखवला आहे. 'पठाण'च्या अॅडव्हान्स बुकिंगबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने 50 कोटींचा आकडा पार केल्याचे सांगितले जात आहे.
शाहरुख खानच्या 'पठाण' या 4 वर्षांनंतरच्या कमबॅक चित्रपटाची क्रेझ त्याच्या चाहत्यांमध्ये दिसून येत असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. 'पठाण' या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'ब्रह्मास्त्र'चा विक्रम तर मोडलाच, पण पठाण आता 'KGF 2'ला कडवे आव्हान देताना दिसत आहे.
या चित्रपटाबाबत ट्विटरवर लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत आहेत. शाहरुख खान आणि त्याच्या 'पठाण' चित्रपटासाठी चाहत्यांच्या ट्विट्टरवरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर शाहरुखचे फॅन्स किती वेडे आहेत हे समजू शकतं
'पठाण' हा चित्रपट बुधवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून या चित्रपटातून बऱ्याच कालावधीनंतर अभिनेता मोठ्या पडद्यावर त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. तरण आदर्शने ट्विटरवर सांगितले आहे की, शाहरुखचा चित्रपट देशभरातील ५२०० स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे, जो हिंदी तमिळ आणि तेलगू या तिन्ही भाषांमध्ये आहे. तो जगभरातील 2500 स्क्रीनवर येत आहे. म्हणजेच जगभरात हा चित्रपट 7700 स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे.
चित्रपट पाहणाऱ्या लोकांनी ट्विटरवर लिहिले आहे – पठाण मध्यांतरापर्यंत एक सरप्राईज आहे, वेगवान, उच्च व्होल्टेज अॅक्शन. शाहरुख खानच्या इंट्रो सीनने थिएटरला स्टेडियम बनवले आहे. चित्रपटाच्या पहिल्या शोबाबत चाहत्यांमध्ये जी क्रेझ पाहायला मिळत आहे
ही क्रेझ सध्या लोकांनी ट्विटरवर शेअर केली आहे. मुंबईत सकाळी ७ वाजताच्या 'पठाण' शोची क्रेझ पाहून बॉयकॉटचा काहीही परिणाम चित्रपटावर झाला नाही असंच म्हणावं लागेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.