कंगना रनौतने बदलली कौतूक करण्याची स्टाईल
Fans say that Kangana is again praising the actress in the old style

कंगना रनौतने बदलली कौतूक करण्याची स्टाईल

मुंबई: नुकतेच अभिनेत्री कंगना रनौतला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री कंगना रनौतचे चाहते सध्या खूप आनंदित आहेत. पंगा आणि मणिकर्णिका या दोन चित्रपटासाठी कंगनाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दुसरीकडे, कंगना रनौत ही सध्या तिच्या आगामी 'थलाईवी' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचे पहिले गाणे  चित्रपटाच्या ट्रेलरनंतर रिलीज करण्यात आले आहे, जे चाहत्यांना खूप आवडले आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा हा चित्रपट पाहण्यासाठी दक्षिण अभिनेत्री सामन्था अक्किनेनी एक ट्विट केले आहे.

कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. प्रत्येक सामाजिक आणि राजकीय विषयावर कंगना आपले स्वतंत्र मत व्यक्त करते. अलीकडेच सामन्था अक्केनेनीने कंगनाच्या चित्रपटासाठी ट्वीट केले आहे, या ट्विट ला रीप्ले करतांना कंगनानेही दक्षिण अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. शुक्रवारी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या बायोपिक 'थलाईवी' चे पहिले गाणे 'चली चली' रिलीज झाले आहे. कंगनाने अभिनेत्री सामन्था अक्केनेनींना 'महिला सबलीकरणाचे प्रतीक' म्हटले आहे. अम्माची अतुलनीय कृपा आणि तिच्या आश्चर्यकारक पडद्यामागील उपस्थिती बद्दल सर्वांना माहित आहे. त्यांच्या सिनेमापासून ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या आवाजाचे साक्षीदार व्हा, असे  सामन्थाने गाणे सोशल मीडियावर शेअर करत लिहिले आहे.

"दयाळू असल्याबद्दल माझ्या प्रिय समांथाचे आभार ... तुम्ही महिला सबलीकरणाचे प्रतीक आहात, आम्हाला एकमेकांना सक्षम बनविणे आवश्यक आहे आणि तेच खरे स्त्रीत्व आहे, धन्यवाद." असे म्हणत कंगनाने रीट्विट केले आहे. ज्याप्रकारे कंगनाने दक्षिण अभिनेत्रीचे कौतुक केले आहे त्याप्रमाणे प्रत्येकजण कमगनाचे कौतुक करीत आहे. अलीकडेच कंगनाने पगलैट साठी सान्या मल्होत्राचे कौतुक केले आहे. अशा परिस्थितीत कंगना पुन्हा जुन्या स्टाईलमध्ये अभिनेत्रीचे कौतुक करत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com