चाहत्यांनो तुम्ही चूकलात! म्हणत सुपरस्टार रजनीकांत भडकले

आगामी काळात रजनीकांत यांचा अन्नाथे नावाचा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे.
चाहत्यांनो तुम्ही चूकलात! म्हणत सुपरस्टार रजनीकांत भडकले
Superstar RajinikanthDainik Gomantak

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचे (Superstar Rajinikanth) भारतातच नाही तर जगभरात फॅन्स (Fan) आहेत. आपल्या अभिनयामुळे रांजनीकांत हे नेहमी लोकप्रिय ठरले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये राजनीकांतला देव मानले जाते. जेव्हा त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार असतो तेव्हा त्यांचे फॅन्स निरनिराळ्या प्रकारच्या कल्पना लढवतांना दिसतात. त्यांच्या फोटोला दही आणि दुधाचा अभिषेक केला जातो. पण यावेळी त्यांच्या फॅन्सने केलेल्या कृत्यामुळे रजनीकांत यांना खूप वाईट वाटले आहे. त्यांनी सोशल मेडियावर अशी खंत व्यक्त केली आहे. आगामी काळात रजनीकांत यांचा अन्नाथे (Annathae) नावाचा चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. तेव्हा त्यांच्या चाहत्यांनी रजनीकांत यांना शुभेच्छा देण्यासाठी जो काही प्रकार केला आहे त्याची सध्या सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे

सुपरस्टार रजनीकांत यांच्या अन्नाथे नावाच्या चित्रपटाच्या पोस्टरवर चाहत्यांनी बकरीचे रक्त शिंपडले आहे. याचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. राजनीकांतच्या चाहत्यांनी प्रथमच असे कृत्य केल्याची माहिती समोर आली असून रजनीकांत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मला माझ्या चाहत्यांकडून या प्रकारच्या कृत्याची अपेक्षा नव्हती. चाहत्यांनी जे काही केल ते एकूण खूप वाईट वाटल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Superstar Rajinikanth
...जेव्हा कौन बनेगा करोडपतीमध्ये किंग खानचा झाला होता अपमान

अखिल भारतीय रजनीकांत रसिकर मंदरम फॅन्स क्लबच्या सदस्यांनी सुद्धा या कृत्याला निषेध केला आहे. जे कृत्य घडले आहे त्याचे समर्थन करता येणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सोशल मिडिवायर एक व्हिडिओ व्हायर झाला आहे. त्यात रजनीकांत यांचे चाहते बकरीला मारून तिचं रक्त त्या चित्रपटाच्या पोस्टरवर शिपडताना दिसत आहेत. काही चाहत्यांच्या या कृत्याला सोशल मिडियावर अनेकांनी निषेध केला आहे. सुपरस्टार सजनीकांत यांच्या लोकप्रियेतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही घटना प्रथमच घडली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com