‘संघर्षाच्या काळात वडिलांनी मदत केली नाही’

Father did not help during conflict
Father did not help during conflict

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असते. आता कंगनाने आपल्या संघर्षाची कहाणी सांगणारे ट्विट केले आहे. कोणाचीही भीड न बाळगता वेगवेगळ्य़ा विषयांवर तीने बेधडकपणे ट्विट करताना आपण कंगनाला पाहिले आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्य़ेनंतर तीने प्रकर्षाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर हल्ला केला होता. आणि यासंबंधी अनेकांचा रोषही ओढवून घेतला होता.

तसेच तीचा आणि शिवसेनेबरोबरचा संघर्ष साऱ्या महाराष्ट्राने पाहिला, या संघर्षांनंतर तिच्या खारमधील ऑफिसवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेखही तीने केला होता. त्याचबरोबर देशात सुरु असलेल्य़ा शेतकरी आंदोलनावरुन अनेक सेलिब्रेटींबरोबर तीचा ट्वीटरवरुन शाब्दीक वाद झाला होता. कंगनाने नेहमीच भाजपच्या धोरणांशी पूरक आपली भूमिका मांडली आहे.

कंगनाने आपले आयुष्यात आलेल्या कठीण परिस्थीतीवर मात करत आपण कशी उभी राहीले त्यासंबंधी तीने ट्विट केले आहे. आणि यात तीने आपल्या संघर्षाची गाथा वाचली आहे. ''वयाच्या 15 व्य़ा वर्षी आपण राहते घर सोडले. माझ्या संघर्षाच्या काळात वडिलांना मदत करण्यास नकार दिला होता. वयाच्या 16 व्या वर्षी मी माफियांच्या संपर्कात आले. तसेच वयाच्या 21 वर्षी आपण आयुष्य़ातील सर्व खलनायकांना संपवलं. अभिनय कौशल्यांच्या जोरावर अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. यशस्वी अभिनेत्री म्हणून असा बहूमान मिळवला. वांद्रेमध्ये एकदम पॉश वसाहतीत स्वात:च्या मालकीचे घरही घेतले.'' असं कंगनाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com