''वडील संकटात होते मात्र माधुरी शूटिंग करत राहिली''

दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी सांगितली धकधक गर्लची खासियत
Madhuri Dixit
Madhuri Dixit Dainik Gomantak

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी बॉलिवुडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांनी संघर्ष केला आहे. यानंतर ते सिनेक्षेत्रात यशस्वी ठरले अथवा ठरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर वेबसीरिज तसेच रिएलिटी शोमध्ये उतरलेल्या जिच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. अशा धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या कामाबाबतच समर्पण दिग्दर्शक राजकुमार संतोषी सांगितलं ते नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माधुरीबद्दल भरभरुन बोलत होते. (father was in trouble but Madhuri continued shooting)

Madhuri Dixit
कंगना रनौतच्या 'त्या' वाक्यामुळे ट्रोल झाली अनन्या पांडे

राजकुमार संतोषी यांनी यावेळी सांगितलं की, धकधक गर्ल आपलं प्रत्येक काम जीव ओतून करणं ही तिची खासियतच आहे. माधुरीवर कितीही संकटं आली तरी आपल्या कामाला ती पहिलं प्राधान्य देते. राजकुमार संतोषी आणि माधुरी यांनी काही चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे.

Madhuri Dixit
केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ; मोबाईल आणि लॅपटॉप जप्त

चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान माधुरीबरोबरचा अनुभव सांगताना राजकुमार संतोषी म्हणाले, “माधुरी आपल्या कामावर कधीच खाजगी आयुष्याचा परिणाम होऊ देत नाही. उटीमध्ये आम्ही एका चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना प्रॉडक्शनमधील एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला विचारलं आपण दुपारी अडीच वाजेपर्यंत पॅकअप करू शकतो का ? कारण माधुरीला संध्याकाळी जायचं आहे. दुपारी मला कळालं की माधुरीच्या वडिलांच्या घरी छापा टाकण्यात आला आहे. इतकं टेन्शन असून देखील ती कॉमेडी सीनचं चित्रीकरण करत होती.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “त्यावेळी बंगळूरमधून मुंबईला जाण्यासाठी फ्लाइट होती. ३ ते ४ वाजता जरी आम्ही पॅकअप केलं असतं तरी माधुरीला बंगळूरमधून मुंबईमध्ये जावं लागलं असतं. आणि तिला यादरम्यान मुंबईमध्ये पोहोचायला रात्र झाली असती. इतकी अडचण निर्माण झाली असताना तिने दिग्दर्शकाला मात्र काहीच कळू दिलं नाही. ती चित्रीकरण करतच राहिली.”

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com