'बिग बी' घरातून पळून आले असे वाटल्याने दिग्दर्शकाने केला थेट वडिलांना फोन

'कौन बनेगा करोडपती शो मध्ये अमिताभ बच्चन यांनी समोर बसलेल्या स्पर्धक डॉ. संचाली चक्रवर्ती यांना प्रश्न विचारला, ज्या मध्ये त्यांच्या पहिल्या चित्रपटाशी संबंधित होता.
'बिग बी' घरातून पळून आले असे वाटल्याने दिग्दर्शकाने केला थेट वडिलांना फोन
Amitabh BachchanDainik Gomantak

'कौन बनेगा करोडपती 13’ (KBC 13) या शोमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी गणेशाचे नाव शो ची सुरुवात केली. जेव्हा शो सुरू झाला, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी समोर बसलेल्या स्पर्धकाला डॉ. संचाली चक्रवर्ती यांना आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल एक प्रश्न विचारला, जो त्यांच्याच पहिल्या चित्रपटाशी संबंधित होता.

आपल्या चित्रपटाशी (Movies)सबंधित प्रश्न येताच अमिताभ यांना आपले जुन्या दिवसाची आठवण झाली. त्याच दरम्यान, त्यांनी आपल्या दिग्दर्शकाला ते घरातून पळून गेले आहेत असे वाटले. त्यानंतर त्यांनी थेट पालकांनाच फोन केला, याबद्दलचा एक मजेदार किस्साही सर्व प्रेक्षकांना सांगितला.

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाशी संबंधित काय होता प्रश्न:

हॉट सीट वर असलेल्या स्पर्धकाला विचारण्यात आले होते की, सात हिंदुस्तानी चित्रपटाचे दिग्दर्शक (Director)आणि पटकथा लेखक कोण होते? मात्र स्पर्धक या प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नाहीत आणि त्यांनी मदत मागितली. त्यानंतर तज्ज्ञांनी त्यांना बरोबर उत्तर दिले. ख्वाजा अहमद अब्बास हे त्याचे उत्तर होते. यानंतर, बिग बी यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाशी संबंधित त्यांचा मनोरंजक किस्सा सर्वाना सांगितला. बिग बी यांनी सांगितले की, दिग्दर्शक अब्बास हे त्यांची ऑडिशन घेत होते. त्यांनी अमिताभ यांना त्यांचे पूर्ण नावाची विचारणा केली. त्यानंतर अमिताभ यांचे आडनाव ऐकल्यानंतर त्यांनी वडिलांचे नाव विचारले. यावेळी मी हरिवंश राय बच्चन (Harivansh Rai Bachchan)यांचा मुलगा आहे, असे सांगताच दिग्दर्शकाने त्यांना लगेच बोलावून घेतले.

Amitabh Bachchan
'कौन बनेगा करोडपति 13' चे Schedule जाहीर

'बिग बी' चा पहिला चित्रपट:

अमिताभ बच्चन यांनी आपल्या कलाकाराची (artist)सुरुवात 1969 मध्ये ‘सात हिंदुस्तानी’(‘Saat Hindustani’) या चित्रपटापासून केली. या चित्रपटातील मल्टीस्टार कलाकारांपैकी ते एक होते. मात्र, त्यांना या चित्रपटानंतर कोणतीही विशेष ओळख मिळाली नाही. त्यानंतर अमिताभ यांच्या कारकिर्दीची खरी सुरुवात 1973 मध्ये ‘जंजीर’ ('Zanjeer')या चित्रपटाने झाली. या चित्रपटानंतर अमिताभ ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या चित्रपटाने त्यांना एक वेगळ्याच उंचीवर नेले, जिथून सुरु झालेली अमिताभ यांची कारकीर्द आज तागायत सुरू आहे. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत कधीच मागे वळून पाहिले नाही.

जेव्हा दिग्दर्शक वडिलांना फोन लावतात;

ऑडिशनच्या वेळी दिग्दर्शक अब्बास (Director Abbas)यांना वाटले की, अमिताभ बच्चन अभिनेता होण्यासाठी घरातून पळून आले आहेत. आणि त्यांच्या कुटुंबाला याबद्दलची माहिती नाही. त्यावेळी अमिताभ यांना ऑडिशन हॉलमध्ये थांबण्यास सांगण्यात आले. आणि ते अमिताभ यांच्या वडिलांना फोन केला. त्यांनी घरी फोन करून सांगितले की, तुमचा मुलगा लुक टेस्टसाठी इथे आला आहे. यावर दिग्दर्शकाची खात्री पटली आणि त्यांना कळले की, अमिताभचे वडील हरिवंशराय बच्चन यांना माहित होते की त्यांचा मुलगा ऑडिशनसाठी गेला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com