किंग खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या सेटवर मारामारी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 23 जानेवारी 2021

'पठाण' चित्रपटाचे दिग्दर्शक सिदार्थ आंनद यांना त्यांच्याच असिस्टंट डायरेक्टरने चक्क कानाखाली मारल्याचे समोर आले आहे.

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दिपिका पदुकोन यांचा येवू घातलेला ‘पठाण’ या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. मात्र हा चित्रपट बुधवारी एका वेगळ्याच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. सेटवर चित्रपटाचे शूटिंग  चालू असताना 'पठाण' चित्रपटाचे दिग्दर्शक सिदार्थ आंनद यांना त्यांच्याच असिस्टंट डायरेक्टरने चक्क कानाखाली मारल्याचे समोर आले आहे.

सिद्धार्थ आंनद यांना सेटवर शांतता लागते. मात्र त्यांचा असिस्टंट डायरेक्टर त्यांना न जुमानता सतत गोंधळ करत होता. सिध्दार्थ यांनी त्यास सेटवर फोन आणण्यास मनाई केली असतानाही तो फोन आणत होता. तसेच तो असिस्टंट आपल्या हाताखालच्या लोकांना सतत शिवीगाळ सुध्दा करत होता. दरम्यान सिद्धार्थ  यांनी त्याला दोन ते तीन वेळा समज देवूनही पाहिले. मात्र तो ऐकत नसल्याचे पाहून ते त्याच्यावर ओरडले. त्यावरुनच सेटवर त्यांच्या दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यांनतर यांनी त्याला कानाखाली मारले. हे पाहून त्याने देखील सिध्दार्थ यांच्या कानशिलात मारली. या सगळ्या प्रकारामुळे सेटवरील वातावरण चांगलच तापलं. त्यानंतर सिध्दार्थ यांनी त्या असिस्टंटला सेटवरुन तात्काळ हाकलून दिले.

 शाहरुख खान तब्बल तीन वर्षानंतर ‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून  चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात शाहरुख खान सोबत दिपिका  पदुकोन, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया दिसणार आहेत. शाहरुख तीन वर्षापूर्वी 2018 मध्ये झीरो चित्रपटात दिसला होता.

मात्र पठाण चित्रपट प्रदर्शीत होण्यागोदरच अंतर्गत वादामुळे चर्चेत आला आहे. दरम्यान पठाण चित्रपटाने सोशल मिडियावर बहार आणली आहे. या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.   

संबंधित बातम्या