अमिताभ बच्चन यांच्याविरूद्ध एफआयआर

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

कौन बनेगा करोडपती चे निवेदक अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही शोच्या निर्मात्यांविरूद्ध शुक्रवारी 'करमवीर' या विशेष एपिसोडमध्ये विचारलेल्या प्रश्नासाठी एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

मुंबई : कौन बनेगा करोडपती चे निवेदक अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही शोच्या निर्मात्यांविरूद्ध शुक्रवारी 'करमवीर' या विशेष एपिसोडमध्ये विचारलेल्या प्रश्नासाठी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. अभिनेता अनुप सोनी आणि सामाजिक कार्यकर्ते बेजवाडा विल्सन हे या विशेष भागात सहभागी झाले होते.

लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी पोलिसांना यासंदर्भात लेखी तक्रार दिली आहे. 
मनुस्मृतीविषयी प्रश्न विचारुन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्याचा आरोप अभिमन्यू पवार यांनी केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी हा वादग्रस्त प्रश्न 6,40,000 रुपयांसाठी विचारला ज्याने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले.

हा वादग्रस्त प्रश्न असा होता:

२५ डिसेंबर १९२७ रोजी डॉ.बी.आर. आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी कोणत्या शास्त्राच्या प्रती जाळल्या?
पर्याय असेः
(अ) विष्णू पुराण (ब) भगवद्गीता, (क) ऋग्वेद (डी) मनुस्मृती
उत्तर मनुस्मृती म्हणून घोषित करतांना बिग बी यांनी स्पष्ट केले की डॉ. आंबेडकर यांनी पुरातन हिंदू ग्रंथाच्या प्रती जाळल्या.

पर्यायांमध्ये इतरही धर्म यायला हवे होते. परंतु विष्णूपुराण, श्रीमद्भगवद्गीता, ऋग्वेद, मुनस्मृती अशा फक्त हिंदू धर्मीयांशी निगडित धर्मग्रंथांचा उल्लेख करण्यात आला. बाकीच्या धर्मांच्या ग्रंथांचा समावेश पर्यायांमध्ये का केला नाही?” असा सवाल अभिमन्यू पवार यांनी केला. या घटनेनंतर केबीसी वर टिका होत असून, हा कार्यक्रम डाव्या विचारसरणीचा प्रसार करतो, असे आरोपदेखील होत आहेत.

संबंधित बातम्या