अश्लील व्हिडीओ प्रकरणी पूनम पांडे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

काणकोण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तिविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून या त्याने अभिनेत्री पूनम पांडेचा अश्लील व्हिडीओ शूट केला असल्याचा आरोप या तक्रारीत केलेला आहे.

 पणजी- गोव्यात पूनमे पांडे सध्या चांगलीच चर्चेत आहे. आता ती परत वादाच्या भोवऱ्यात सापडली असून तिच्या विरोधात गोव्यातील चपोली डॅमवर अश्लील व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोवा फॉरवर्डच्या महिला विंगने ही तक्रार दाखल केली आहे. पूनम ही नुकतीच शूट संपवून मुंबई दाखल झाली होती.  

मिळालेल्या माहितीनुसार, गोव्याच्या काणकोण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तिविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली असून या त्याने अभिनेत्री पूनम पांडेचा अश्लील व्हिडीओ शूट केला असल्याचा आरोप या तक्रारीत केलेला आहे. याशिवाय गोवा फॉरवर्डट पक्षाच्या महिला विंग ने चपोली डॅमवर अश्लील व्हिडीओ शूट करण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.  

काही दिवसांपूर्वीच गोव्यात पूनम पांडेने सैम बॉम्बेशी विवाह केला होता. त्याच्या काही दिवसांतच पूनमने नवऱ्याविरोधात मारपीट केल्याचा आरोप केला होता. पूनमला त्यावेळी रूग्णालयातही दाखल करण्यात आले होते. पूनमच्या तक्ररीनंतर सॅमला पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. दोघे जेव्हा मुंबईत आले त्यावेळी दोघांमधील भांडणही मिटले होते.    
 

संबंधित बातम्या