Sherni First Look : विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शीत

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 मे 2021

विद्याचा शेरनी हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालनचा पहिला लूक शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार आहे हे देखील सांगितले आहे.

मुंबई: शकुंतला देवी(Shakuntala Devi) या चित्रपटापासून विद्या बालनने(Vidya balan) डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे. शकुंतला देवी रिलीज होवून एक वर्ष पूर्ण होणार आहे. आता विद्याचा शेरनी(Sherni) हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर(amazon prime) रिलीज होणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्री विद्या बालनचा पहिला लूक शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार आहे हे देखील सांगितले आहे.(The first look of Vidya Balan Sherni is released)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

विद्या बालनने या चित्रपटातील तिचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना जगात निर्भयतेने पाऊल ठेवत. माझा नव्या सिनेमा 'शेरनी' जाहीर केल्याने मला आनंद झाला. शेरनीसोबत जूनमध्ये प्राइमवर भेट होणार,"असे कॅप्शन विद्याने या पोस्ट ला दिले आहे. हजारो लोकांना विद्याची ही पोस्ट आवडली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी विद्याच्या या पोस्टवर भाष्य केले आहे. आणि विद्याचे अभिनंदन केले आहे. विद्याच्या एका चाहत्याने तीचे अभिनंदन केले तर त्याच वेळी, दुसर्‍या फॅन्सने आपल्याला पुन्हा पडद्यावर पाहण्याच्या प्रतिक्षेत अशी कमेंट केली आहे.

Radhe Piracy: सलमान खानने दिली फिर्याद; मुंबई पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये   

विद्या बालन शेरनी या चित्रपटात एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. विद्याने काही काळापूर्वी पुन्हा शेरनी चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार ची माहिती दिली होती. तिनी पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशात झाले आहे. एका मुलाखतीत विद्याने शेरनीबद्दल त व्यक्त केले होते. 'शकुंतला देवी' जुलैमध्ये रिलीज झाली होती, परंतु कोरोना साथीच्या महामारीमुळे मला माझ्या आगामी 'शेरनी' चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेविषयी स्पष्ट माहिती सांगता येणार नाही. हा चित्रपट थिएटरमध्ये किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल की नाही हेदेखील मला माहिती नाही. पण काही महिन्यांनंतर हा चित्रपट नक्कीच प्रदर्शित होईल, असे विद्याने एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते. 

auktae Cyclone: बीग बींनी केली चिंता व्यक्त; चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन

विजय राज चित्रपटाच्या बाहेर 
विद्या बालनचा ‘शेरनी’ हा चित्रपट काही काळापूर्वी चर्चेचा विषय होता. या चित्रपटात विद्या सोबत विजय राजसुद्धा दिसणार होता पण त्याला चित्रपटातून वगळण्यात आले. या चित्रपटाशी जुळलेल्या एका महिलेने विजयवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्या महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी विजयला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

संबंधित बातम्या