रणधीर कपूर ने चूकून शेअर केलेला करीना कपूरच्या मुलाचा पहिला फोटो होतोय व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 6 एप्रिल 2021

करीनाच्या दुसर्‍या मुलाच्या पहिल्या झलकची आतुरतेने वाट पाहत असतांनाच करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी आपल्या नातवाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबई : 21 फेब्रुवारी रोजी करीना कपूर खानने तिच्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. चाहते करीनाच्या दुसर्‍या मुलाच्या पहिल्या झलकची आतुरतेने वाट पाहत असतांनाच करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी आपल्या नातवाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते रणदीर कपूर यांनी आपल्या इंस्टाग्राम हँडलचा वापर केला. रणधीर कपूरने करीनाचा मोठा मुलगा तैमूर आणि आता जन्माला आलेला मुलगा या दोघांचेही फोटो एकत्र शेअर केले होते. ते दोघेही अगदी न्यु बॉर्न बेबी होते. मात्र, थोड्याच वेळात त्यांनी हे फोटो सोशल मिडियावरून डिलीट केले. करीनाच्या दोन्ही मुलांचा फोटो पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलताना करीना कपूर याआधी इंग्लिश मीडियम चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात करीना कपूरने इरफान खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात करीना कपूरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. आगामी काळात करीना लालसिंग चड्ढामध्ये दिसणार असून, तीच्यासोबत आमिर खान असणार आहे. याशिवाय लवकरच अभिनेत्री वीरे दी वेडिंग 2 मध्येही दिसणार असल्याची बातमी आहे.

संबंधित बातम्या