Deepika Padukone कडून घ्या फिटनेसचे धडे

पडद्यावर दिसणारी सुंदर शरीरयष्टी मिळवणे सोप्पे नाही. या शरीरयष्टीच्या मागे वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, प्रशिक्षण आणि निरोगी आहार आहे.
Deepika Padukone कडून घ्या फिटनेसचे धडे
Fitness Lessons From Deepika PadukoneDainik Gomantak

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आपल्याला नेहमीच फिटनेस कॉनशियस बघायला मिळते, म्हणूनच दीपिका पदुकोण कडून तंदुरुस्त कसे रहायचे त्याचे धडे (Fitness Lessons From Deepika) आज आपण घेऊयात, कोणत्या व्यायामामुळे (workout) दीपिका तंदुरुस्त राहते हे आपण आज जाणून घेणार आहोत. दीपिका पदुकोण फिट राहण्यासाठी जिममध्ये कष्ट घेते, तिला सर्वात जास्त पिलाटेज (pilates workout) करण्यात मजा येते. दीपिकाच्या फिटनेसमागे नक्की कोणत्या प्रकारचा व्यायाम आहे हे जाणून घेऊयात.

Fitness Lessons From Deepika Padukone
सीतेच्या भूमिके बद्दल करीना कपूरने सोडले मौन

दीपिका पदुकोणकडून फिटनेस धडे:

पडद्यावर दिसणारी सुंदर शरीरयष्टी मिळवणे सोप्पे नाही. या शरीरयष्टीच्या मागे वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, प्रशिक्षण आणि निरोगी आहार आहे. दीपिकाच्या फिटनेसमागे कोणत्या प्रकारची कसरत आहे हे जाणून घ्या.

पिलाटेज हा दीपिकाचा आवडता व्यायाम आहे

दीपिकाला पिलाटेज करायला आवडते. यातून तिला मिळणारी ऊर्जा दीपिकाला सुखावणारी आहे. एका दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने शेअर केले की जर तिला वाटत असेल की तिचे योग्य शरीर आकारात नाही असे वाटले , तर ती लगेच वर्कआउट चालू करते. ती दररोज फक्त निरोगी आणि सकस आहार घेते. दीपिकाला आरोग्याशी तडजोड करायला आवडत नाही.

Fitness Lessons From Deepika Padukone
'Manike Mage Hithe' या श्रीलंकन गाण्यावर गोवणं कलाकारांची धूम; पाहा Video

जास्त खात नाही -

दीपिका पुढे सांगते की तिचा एक नियम आहे की ती कधीही डोळ्यांना दिसेल ते खात नाही. पोट भरण्या इतपतच ती आहार घेते. तिची प्रशिक्षक यास्मीन कराचीवाला म्हणते की दीपिका योग्य प्रमाणात खाते, जिबात जास्त खात नाही.

हे व्यायाम करा

दीपिका प्रशिक्षणाला खूप महत्त्व देते. तिच्या मते, शरीर मजबूत होण्यासाठी प्रशिक्षणाचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे. हे भरपूर कॅलरीज बर्न करते, चयापचय वाढवते आणि चिंता दूर करते. तुम्ही कोणताही व्यायाम करा, पण तो सतत करा आणि ब्रेक घेऊ नका. नवीन आव्हानांसाठी तयार रहा आणि दररोज स्वतःला आव्हान द्या.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com