रेखा अन् इम्रान खानची 'अधूरी एक कहाणी', वाचा रंजक किस्सा

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 12 मे 2021

माजी क्रिकेटपटू इम्रान खान आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखाची कहाणी. इम्रानचे नाव जरी अनेक अभिनेत्रींशी जोडले गले असले तरी रेखासोबत त्याचे लग्न होणार होते असे अजूनही म्हटलं जात.

मुंबई: क्रिकेट(Cricket) आणि बॉलिवूडचा(Bollywood) जुना संबंध आहे. नीना गुप्तापासून ते अनुष्का शर्मापर्यंत(Anushka Sharma) क्रिकेट-आणि बॉलिवूडमधील अनेक अपयशी-यशस्वी रिलेशनशिपच्या(Relationships) बातम्यां(News) आपण एकल्या आहेत. आता पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेअरच्याही बर्‍याच बातम्या आपल्या कानावर आल्या. त्यापैकीच एक म्हणजे सध्याचे पाकिस्ताचे पंतप्रधान(Prime Minister of Pakistan) आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान(Imran Khan) आणि बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखाची(Rekha) कहाणी. इम्रानचे नाव जरी अनेक अभिनेत्रींशी जोडले गले असले तरी रेखासोबत त्याचे लग्न(Married) होणार होते असे अजूनही म्हटलं जात.(Former cricketer Imran Khan and Bollywood actress Rekha almost got married)

ईशा अंबानीसाठी डिझाइनरने सोन्यापासून तयार केला खास लेहंगा

इंस्टाग्रामवर एक पोस्ट व्हायरल

त्या काळातील बर्‍याच वृत्तांत रेखा आणि इम्रान खानच्या अफेअरची चर्चा होती. रेखा आणि इम्रान प्रेमात पडल्याचे सांगितले जात होते. इतकेच नाही तर रेखाच्या आईनेही या नात्याला होकार दिल्याचे वृत्त समोर आले होते. अशातच इंस्टाग्रामवर एक पोस्ट व्हायरल झाली. या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये 1985 चा एक लेख शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रेखा आणि इम्रान च्या नात्याबद्दल दावा केला गेला आहे. भारतीय चित्रपट मासिक ‘मूवी’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, इम्रान खान संपूर्ण एप्रिल महिन्यात मुंबईतच होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sanam Maher (@topbastard)

रेखाच्या आईने दिली होती सहमती

या दरम्यान रेखा आणि इम्रान यांच्यात बऱ्याच भेटी झाल्या होत्या. हे दोघेही नाईटक्लब आणि समुद्र किनाऱ्यावर दिसले. त्याच अहवालात म्हटले आहे की, इमरान खानशिवाय रेखासाठी दुसरा कुणीच योग्य जोडीदार नाही असे रेखाच्या आई ने म्हटले होते. या नात्यासाठी ती दिल्लीला गेली आणि एका ज्योतिषाशी भेटही घेतली होती.  इमरान त् रेखासाठी योग्य साथीदार आहे की, नाही हे तिला जाणून घ्यायचे होते. मात्र या नात्याबाबत ज्योतिष्य काय बोलले ते कोणालाच माहिती नाही, पण ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार रेखाची आई इम्रानच्या कुटुंबीयांसोबत नाते जोडण्याचा विचार करत होती.

HFPA Controversy:टॉम क्रूझने तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार केले परत

'मी रेखाबरोबर अविश्वसनीय वेळ घालवला'
'मी रेखाबरोबर कायम स्मरणात राहील असा वेळ घालवला आहे. मात्र मला या नात्यातून बाहेर पडावे लागेल. कोणत्याही चित्रपट अभिनेत्रीशी लग्न करण्याचा माझा हेतू नाही,' असे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान म्हणाले होते. मात्र रेखाने या नात्यावर कधीच कोणतेही वक्तव्य केले नाही. नंतर रेखाचे नाव झीनत अमान आणि शबाना आझमी यांच्याशीही जोडले गेले होते. 

संबंधित बातम्या