Pathaan: टीम इंडियाच्या खेळाडूंनाही 'पठाण'ची भुरळ; वीरु भाऊने केले कौतुक

टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने सुपरस्टार शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाचे कौतुक केले आहे.
Pathaan
Pathaan Dainik Gomantak

Virender Sehwag On Pathan Movie: सुपरस्टार शाहरुख खानचा चित्रपट 'पठाण' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घालत आहे. या चित्रपटाला समीक्षकांसोबतच प्रेक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 

मनोरंजन विश्वातील सर्वच दिग्गजांनी शाहरुखच्या 'पठाण' चे कौतुक केले आहे. अशातच आता 'पठाण' क्रीडा विश्वातही वाहवा लुटत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने 'पठाण' चित्रपटाचे सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत कौतुक केले आहे.

Pathaan
Christopher Nolan :'द डार्क नाईट'मधला हा सीन मला आवडतो" दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान काय म्हणाला?

सेहवागने इस्टावर व्हिडिओ शेअर करत कौतुक

रविवारी टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक नवा व्हिडिओ शेअर केला. सेहवागचा हा व्हिडिओ शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपटगृहात पाहायला गेला तेव्हाचा आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये वीरेंद्र सेहवागने 'पठाण'चे जोरदार कौतुक केले आहे. 

वीरेंद्र सेहवागच्या आधी क्रिकेटचा गॉड म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिनेही शाहरुख खानचा चित्रपट पठाण लंडनमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत पाहिला आहे. यावरून ‘पठाण’ हा चित्रपट प्रत्येकाचना आवडत आहे हे स्पष्ट झाले आहे.

'पठाण'ची जादू सर्वत्र पसरली

सुपरस्टार शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटातून तब्बल 4 वर्षांच्या पुनरागमनाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. 'पठाण'ने पहिल्या एक्स्टेंडेड वीकेंडला 277 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 

एवढेच नाही तर जगभरातील 'पठाण'ने 500 कोटी कलेक्शनच्या जादुई आकड्यापर्यंत मजल मारली आहे. याशिवाय अनेक चित्रपट कलाकारांनीही शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचे कौतुक केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com