Friends Reunion Trailer: 17 वर्षानंतर न्यूयॉर्कमध्ये पुन्हा भेटणार सहा मित्र

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 मे 2021

90 च्या दशकातला कॉमेडी शो 'फ्रेंड्स'(Friends)ला हॉलिवूड(Hollywood) तसेच भारतातही(India) चांगला प्रतिसाद मिळाला. मार्टा कॉफमॅन आणि डेव्हिड क्रेन निर्मित या शोने 10 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता 17 वर्षानंतर हा शो पुन्हा पडद्यावर येत आहे. त्याचा ट्रेलर रिलीज होताच व्हायरल झाला.

Hollywood हॉलीवूडमध्ये असे अनेक टेलिव्हिजन शो आहेत ज्यांना भारतीय प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले आहेत. भारतातून(India) त्या मालिकांना(Series) प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. यापैकीच एक म्हणजे 90 च्या दशकातला कॉमेडी शो 'फ्रेंड्स' (Friends)ला हॉलिवूड तसेच भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला. मार्टा कॉफमॅन आणि डेव्हिड क्रेन निर्मित या शोने 10 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेचा 1994 मध्ये प्रदर्शित झालेला पहिला भाग चांगलाच गाजला. आजही या शोची लोकप्रियता कमी झालेली नाही. शोचे प्रमुख आघाडीचे कलाकार मॅथ्यू पॅरी, कोर्टनी, डेव्हिड श्विमर, लिसा कुड्रो, मॅट लेब्लांक आणि जेनिफर एनिस्टन(jennifer aniston, matthew perry, mat leblanc, lisa kudrow,jennifer aniston) आजही प्रत्येकाच्या ओळखिचे आहेत. 2004 मध्ये हा शो संपला होता आणि आता 17 वर्षानंतर हा शो पुन्हा पडद्यावर येत आहे. त्याचा ट्रेलर(friends reunion trailer) रिलीज होताच व्हायरल झाला आणि शोच्या चाहत्यांनी त्यांच्या जुन्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या. प्रेक्षकांमध्ये या मालिकेची उत्सुकता दिसत आहे.(Friends Reunion Trailer Six friends to meet again in New York after 17 years)

Happy Birthday Nawazuddin Siddiqui: यांचे पाच प्रसिद्ध डायलॉग

हा खास भाग बेन विन्स्टन यांनी दिग्दर्शित केला असून 27 मे रोजी एचबीओ मॅक्स वर प्रसारित होणार. या चित्रपटाचे शूटिंग स्टेज 24 मध्ये करण्यात आले आहे जेथे या कार्यक्रमाचे मूळ शूटिंग झाले होते. या ट्रेलरमधील सहा मित्र कदाचित म्हातारे दिसत असतील, पण यांच्यातील जोश अजूनही कायम आहे. हे सेलिब्रिटी त्याच अपार्टमेंट आणि कॉफी शॉपमध्ये दिसतात जिथे आधी संपूर्ण शूटिंग झाले होते. 

जेम्स कॉर्डन थेट प्रेक्षकांसमोर असलेल्या स्टारकास्टची मुलाखत घेतील. या सहा कलाकारांव्यतिरिक्त या कार्यक्रमात मॅगी व्हिलर आणि टॉम सेलेक सारख्या अनेक सहकलाकारांचीही भूमिका असणार आहे. मॅगीने या शोमध्ये चॅंडलरची माजी मैत्रीण जेनिसची भूमिका केली होती, तर टॉम सेललेक मोनिकाचा माजी प्रियकर रिचर्ड बुर्केच्या भूमिकेत दिसला होता.

24 अफेअरनंतर झालं खरं प्रेम; अनिल कपूर यांची भन्नाट लव स्टोरी

या शोचे रियूनियन मागील वर्षीच निश्चित झाले होते परंतु कोविड- 19 मुळे त्याचे शूटिंग थांबविण्यात आले. त्यामुळे हा विशेष भाग यावर्षी 27 मे रोजी प्रसारित होईल. आता चाहत्यांसाठी ही या वर्षाची सर्वात मोठी बातमी आहे आणि त्यावर प्रेक्षकांनी भरपूर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या ट्रेलरला आतापर्यंत इंस्टाग्रामवर 1 दशलक्षाहून अधिक ह्युज मिळाले असून या मालिकेचा ट्रेलर यूट्यूब आणि एचबीओ मॅक्स ऑफिशियल चॅनलवरही व्हायरल होत आहे.

17 वर्षांनंतर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या सहा मित्रांची कहाणी दर्शविली गेली होती आणि ते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक आनंद आणि दुःख फक्त त्यांच्या मित्रांसोबत शेअर करत असतात.

संबंधित बातम्या