Friendship Teaser: क्रिकेटनंतर हरभजन लगावणार अभिनयात चौके छक्के

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

क्रिकेटच्या क्षेत्रात आपली कौशल्य दाखवल्यानंतर  क्रिकेटपटू आता कलाकारांच्या भुमिकेत दिसत आहेत. आता अ‍ॅक्टींगच्या जगात आपली छाप पाडण्याचा ट्रेंड क्रिकेटर्समध्ये सुरू आहे.

मुंबई: क्रिकेटच्या क्षेत्रात आपली कौशल्य दाखवल्यानंतर  क्रिकेटपटू आता कलाकारांच्या भुमिकेत दिसत आहेत. आता अ‍ॅक्टींगच्या जगात आपली छाप पाडण्याचा ट्रेंड क्रिकेटर्समध्ये सुरू आहे. अशातच टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंगच्या फिल्म फ्रेंडशिपचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझर सुरवात एका डायलॉगने झाली आहे. एका अनोख्या आणि दमदार डायलॉगने हरभजनसिंगची एन्ट्री आहे. एंग्री यंग मॅन सारखी हरभजनने या टिझरमध्ये एंट्री मारली आहे.

टीझरमध्ये हे दर्शविण्यात आले आहे की हरभजन एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भूमिका साकारत आहे आणि त्यादरम्यान त्याच्या आयुष्यात खूप गडबड आहे. कधी त्याचा कोणाशी तरी भांडण होते, तर कधी तो कॉलेजसाठी सामना लढतो. या चित्रपटात हरभजनसोबत अर्जुन आणि लोसालिया मारिया आहेत. त्याच्या या फ्रेंडशिप टीझरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हरभजन यापूर्वी बर्‍याचदा चित्रपटांमध्ये दिसला आहे. सर्वात आधी तो सलमान खान, प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमारचा चित्रपट मुझसे शादी करोगी या चित्रपटात दिसला. यानंतर तो पंजाबी चित्रपटांमध्येही दिसला आहे. यानंतर तो सेकंड हैंड हसबँडमध्येही दिसला आहे. या चित्रपटात त्याने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली होती. 2016 मध्ये हरभजन टी -20 आंतरराष्ट्रीय खेळला. त्यानंतर तो टीम इंडियाकडून खेळताना दिसला नाही. मात्र आयपीएलमध्ये तो आपला महान खेळ दाखवत असतो.

दरम्यान क्रिकेटरच्या क्षेत्रात आपली कौशल्य दाखवल्यानंतर आता इरफान पठाण देखील रॉक चित्रपटांसाठी सज्ज आहे. अभिनेता चियान विक्रमसोबत तो तमिळ चित्रपट कोब्रामध्ये दिसणार आहे.  त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केरून असून चित्रपटाच्या शूटिंगविषयी सांगितले आहे.

 

संबंधित बातम्या