Fukray 3 : एक्सेल एंटरटेनमेंटने 'फुकरे 3'च्या रिलीजची केली घोषणा, 7 सप्टेंबर 2023 रोजी होणार रिलीज

कॉमेडीने भरपूर असा फुकरे 3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे
Fukray 3
Fukray 3Dainik Gomantak

एक्सेल एंटरटेनमेंटने बॉलीवूडमधील आपल्या सर्वात बहुप्रतीक्षित आणि यशस्वी कॉमेडी फ्रँचायझी 'फुकरे 3'च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. अशातच, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल वाढते क्रेझ लक्षात घेता 'फुकरे 3' नवे स्टँडर्ड्स सेट करेल असे म्हणावं लागेल.

मृगदीप सिंग लांबाद्वारा दिग्दर्शित तसेच रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मित 'फुकरे 3'या सिनेमामध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, रिचा चढ्ढा, मनजोत सिंग आणि पंकज त्रिपाठी या कलाकारांना पाहायला मिळेल.

Fukray 3
Ram Gopal Varma - Rajamauli : राम गोपाल वर्मांनी दिग्दर्शक राजामौलींना दारुच्या नशेत दिल्या धमक्या? काय आहे प्रकरण?

'फुकरे'ही एक यशस्वी फ्रँचायझी ठरली असून, या फ्रँचायझीचा दुसरा भाग, 'फुकरे रिटर्न्स'ने बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले होते.

फ्रँचायझीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे डिस्कव्हरी किड्स चॅनलवर 'फुकरे बॉईज' नावाची अ‍ॅनिमेटेड सिरीज तयार करण्यात आली, ज्याने लहान मुलांसाठी चित्रपटातील अनोख्या पात्रांना टीव्ही स्क्रीनवर पुन्हा जिवंत केले.

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी सह-स्थापित एक्सेल एंटरटेनमेंटने 'झेडएनएमडी', 'दिल चाहता है', 'डॉन', 'डॉन 2' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसह प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अशातच, सध्या प्रॉडक्शन हाऊस मोस्ट अवेटेड 'जी ले जरा'साठी तयारी करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com