बॉलिवूडला अनलॉक करण्याची FWICE ची मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र

दैनिक गोमंतक
गुरुवार, 3 जून 2021

बॉलिवूडमधील सर्वात मोठी संस्था फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सीने एम्प्लॉईज (FWICE) ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शूटिंग पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.  

मुंबई : कोरोनाच्या (Corona) दुसर्‍या लाटेत, देशातील सर्वाधिक बाधित राज्यात महाराष्ट्र आहे. परंतू  आता महाराष्ट्राच्या शहरी भागात परिस्थिती सुधारण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईतही (Mumbai) दररोज कोरोना प्रकरणात घट होत आहे. कोरोनाच्या आकडेवारीत घट झाल्याने राज्य सरकारने काही भागात कोरोनाशी संबंधित निर्बंध कमी केले आहेत. मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर अनलॉकची (Unlock) प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बॉलिवूडलाही (Bollywood) अनलॉक करण्याची मागणी होत आहे. 

''जर मी मुख्यमंत्री झाली तर..'' हुमा कुरेशीने केला खुलासा

बॉलिवूडमधील सर्वात मोठी संस्था फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सीने एम्प्लॉईज (FWICE) ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शूटिंग पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे.  फिल्म, टेलिव्हिजन आणि वेब सीरिजशी संबंधित कोट्यावधी लोकांचे उत्पन्नास नुकसान झाले आहे, असा महासंघाचा दावा आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांच्यासह सर्वांनाच फटका बसला आहे. शुटींग बंद असल्याने या क्षेत्रातील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाईलाजाने अनेक दिग्दर्शक दुसऱ्या राज्यात जाऊन शुटींग करत आहेत.   

संबंधित बातम्या