G-20 Kashmir: ...अन् थंड कश्मीरमध्ये रामचरणने लावली आग... श्रीनगरमध्ये केला नाटू-नाटूवर डान्स,पाहा व्हिडिओ

'फिल्म टुरिझम फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड कल्चरल प्रिझर्वेशन' या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना राम चरण यांनी जम्मू-काश्मीरमधील चित्रपटांच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल सांगितले.
G-20 Kashmir
G-20 KashmirDainik Gomamtak

G-20 Kashmir: जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमध्ये 22 ते 24 मे दरम्यान तिसरी G20 पर्यटन कार्यगटाची बैठक सुरु झाली आहे. परदेशी शिष्टमंडळांव्यतिरिक्त, तेलुगू अभिनेता राम चरण हे देखील आज वक्ते म्हणून श्रीनगरमध्ये दाखल झाले होते.

'फिल्म टुरिझम फॉर इकॉनॉमिक ग्रोथ अँड कल्चरल प्रिझर्वेशन' या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना राम चरण यांनी जम्मू-काश्मीरमधील चित्रपटांच्या शूटिंगच्या अनुभवाबद्दल सांगितले. तसेच त्यांनी आरआरआरमधील ऑस्कर विजेता गाणं नाटू-नाटूवर डान्स देखील केला.

त्यांचे वडील चिरंजीवी यांनी गुलमर्ग आणि सोनमर्ग येथे 'विस्तृत चित्रीकरण' केल्यामुळे तो 1986 पासून काश्मीरमध्ये येत असल्याचे राम चरणने सांगितले. हा कार्यक्रम ज्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता त्या हॉलचा संदर्भ देताना राम चरण म्हणाले की, 2016 मध्ये त्यांनी या सभागृहात एका चित्रपटाचे शूटिंग केले होते.

एएनआय ने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आरआरआरमधील ऑस्कर विजेता गाणं नाटू-नाटूवर डान्स करतांना दिसत आहे. या व्हडिओमध्ये तो पांढऱ्या रंगाचा सुंदर पोषाखामध्ये दिसत आहे.

भारताने गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी G20 बैठकीचे अध्यक्षपद स्वीकारले आणि देशभरात अशा शिखर परिषदेचे आयोजन केले जात आहे. भारतात आत्तापर्यंत 146 ठिकाणी G20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीनगरच्या डल लेकमध्ये असलेल्या शेर - ए- काश्मिर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत 25 देशातील 60 पेक्षा अधिक प्रतिनिधी तसेच जवळपास 100 पेक्षा अधिक पर्यटन क्षेत्राशी जोडलेले लोक सहभागी झाले आहेत.

जी20 च्या पार्श्वभूमीवर काश्मिरमध्ये कडक बंदोबदस्त ठेवण्यात आला आहे. शेर - ए- काश्मिर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्येच्या दिशेने जाणारे दोन्ही रस्ते पुढील दोन दिवसांसाठी सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. प्रतिनिधींची संख्या पाहता सुरक्षेच्या कारणास्तव गुलमर्गचा दौरा रद्द करण्यात आला आहे. 

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण पुढे एस शंकरच्या 'गेम चेंजर' मध्ये कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. हा चित्रपट एप्रिल 2024 मध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. एसएस राजामौलीच्या 'RRR' च्या यशानंतर, 'नाटू-नाटू' गाणे ऑस्कर जिंकले म्हणून राम चरण जागतिक स्टार बनले आहेत. राम चरण यांनी ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब समारंभात त्यांच्या उपस्थितीने जागतिक ठसा उमटवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com