Gadar 2: 'या' पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात पडली सकीना? रोमँटिक व्हिडिओमधून...!

Gadar 2: 'गदर' चित्रपटातील तारा सिंह आणि सकिना यांची प्रेमकहाणी सुपरहिट ठरली आहे. जेव्हापासून 'गदर 2' या चित्रपटाची चर्चा रंगली आहे, तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आहे.
 Sunny Deol & Amisha Patel
Sunny Deol & Amisha PatelDainik Gomantak

Gadar 2: 'गदर' चित्रपटातील तारा सिंह आणि सकिना यांची प्रेमकहाणी सुपरहिट ठरली आहे. जेव्हापासून 'गदर 2' या चित्रपटाची चर्चा रंगली आहे, तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपट रिलीज होण्याआधीच सकीना आणि तारा सिंग कधी लूकने तर कधी सेटवरुन लीक झालेल्या व्हिडिओंमुळे सर्वत्र चर्चेत आहेत.

तारा सिंह आणि सकिना यांची प्रेमकहाणी 'गदर 2'मधून पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे, पण तुम्हाला माहीत आहे का या चित्रपटात पाकिस्तानी मुलीची भूमिका साकारणारी अमिषा पटेल एका पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात पडली आहे. एवढेच नाही तर तिचा या अभिनेत्यासोबतचा रोमँटिक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

काय आहे अमिषा पटेल आणि पाकिस्तानी अभिनेत्याची प्रेमकहाणी-

या रोमँटिक व्हिडिओने अमिषा पटेलची प्रेमकहाणी उघडकीस आणली, सकीनाची भूमिका साकारणाऱ्या अमिषा पटेलने खूप पूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये अमीषा पटेल म्हणजेच सकिना प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बाससोबत दिसली होती. दोघांना व्हिडिओमध्ये रोमान्स करताना पाहून अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. या व्हिडिओमध्ये अमिषा पटेल 'क्रांती' चित्रपटातील 'दिल में दर्द सा' गाण्यात एकमेकांसोबत दिसत आहेत.

 Sunny Deol & Amisha Patel
Gadar 2 First Look : तब्बल 22 वर्षानंतर तारा सिंह पुन्हा पेटुन उठणार, गदर 2 चा फर्स्ट लुक आला समोर

जाणून घ्या काय आहे सत्य-

हा व्हिडिओ पाहताच व्हायरल झाला आणि अमिषाच्या अफेअरच्या बातम्या सर्वत्र पसरल्या, मात्र पाकिस्तानी अभिनेता इम्रान अब्बाससोबतच्या अफेअरच्या वृत्तावर अमिषा पटेलने मौन सोडले. एका मुलाखतीदरम्यान अमिषा पटेल म्हणाली होती की- 'मी देखील असे अनेक रिपोर्ट्स वाचले आहेत, हे संपूर्ण प्रकरण खूपच मजेदार आहे. मी खूप वर्षांनी माझ्या मित्राला भेटले आणि ती फक्त एक भेट होती.'

यासोबतच अमिषाने सांगितले की, 'आम्ही दोघे बहरीनमध्ये एका कार्यक्रमात भेटलो. तेव्हाच हा व्हिडिओ शूट करण्यात आला. 'क्रांती' चित्रपटातील हे गाणे अब्बासला खूप आवडते, त्यामुळे या गाण्यावर व्हिडिओ शूट करण्यात आला होता.'

 Sunny Deol & Amisha Patel
Gadar 2: सनी-अमिषा पुन्हा 'तारा अन् सखीनाच्या लूकमध्ये, जाणून घ्या चित्रपट कधी प्रदर्शित होणार

शिवाय, गदर-2 या चित्रपटात पुन्हा तारा सिंग म्हणजेच सनी देओल (Sunny Deol) आणि सकिना म्हणजेच अमिषा पटेल एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com