Gadar 2 Video Viral : गदर 2 चे चित्रपटाचे शूटींग पूर्ण, हा शेवटचा सीन बघून थक्क व्हाल...

अभिनेता सनी देओलच्या बहुचर्चित गदर चित्रपटाचे शूटींग नुकतेच पूर्ण झाले आहे.
Gadar 2
Gadar 2 Dainik Gomantak

Gadar 2 Video Viral: अभिनेता सनी देओलच्या गदर 2 या चित्रपटाचे शूटींग नुकतेच पूर्ण झाले आहे. 2000 च्या दशकात या चित्रपटाने मोठा धमाका केला होता. आता चित्रपटाचा पार्ट 2 प्रेक्षकांना साद घालत आहे.

सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर 2' हा एक चित्रपट आहे ज्याच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहते या चित्रपटाचे इतके वेडे झाले आहेत की त्याची झलक किंवा काही अपडेट येताच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू होते.

'गदर 2' चे अंतिम शूटिंग आता पूर्ण झाले असून तो आता 11 ऑगस्टला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 

'गदर 2' मध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल तारा आणि सकीनाच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर उत्कर्ष शर्मा त्यांचा मुलगा जीतच्या भूमिकेत दिसणार आहे. फरक एवढाच की 'गदर 2'मध्ये आता जीत मोठा झाला आहे.

गदर 2 ची कथा 1954 ते 1971 पर्यंत दाखवण्यात येणार आहे. या काळात भारत-पाकिस्तानमधील 1971 चे युद्धही दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि अॅक्शन सीक्वेन्स असतील. 

काही वेळापूर्वी 'गदर 2' चा टीझर रिलीज झाला होता, त्यात सनी देओल यावेळी हँडपंप नव्हे तर बैलगाडीचे चाक उचलून हवेत फिरवताना दाखवण्यात आला होता. यावेळी जीतेची मैत्रीणही चित्रपटात असणार आहे. सिमरत कौर या चित्रपटात जीतेच्या मैत्रिणीची भूमिका साकारत आहे.

Gadar 2
Citadel Global Series : 'या' कारणामुळे रुसो ब्रदर्स यांनी 'सिटाडेल' ही ग्लोबल सिरीज बनवली

'गदर 2' बाबत चाहत्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता आहे. चित्रपटाचे शूटिंग संपले आहे आणि आता आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत जेव्हा 'गदर 2' चित्रपटगृहात दाखल होईल आणि इतिहास रचेल. 

दरम्यान, 'गदर 2'च्या शेवटच्या दिवसाच्या शूटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या दृश्याचे शूट दाखवण्यात आले आहे.

व्हिडिओमध्ये असा आवाज येत आहे की, एक व्यक्ती अनिल शर्मा यांना लव सिन्हा वापरण्याबाबत विचारत आहे. या सीनमध्ये लव सिन्हाचा अॅक्शन सीन शूट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com