'वाढत वजन राष्ट्रीय मुद्दा बनला होता' विद्या म्हणाली.....

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

 'इश्किया, कहानी, द डर्ट्री पिक्चर' या चित्रपटानंतर विद्याला एक वेगळी ओळख मिळाली. 2011 मधील द डर्ट्री पिक्चर या चित्रपटातील विद्याचा अभिनय थक्क करायला लावणारा होता.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री विद्या बालन सोशल मिडियावर अनेकदा चर्चेत असेत. 'इश्किया, कहानी, द डर्ट्री पिक्चर' या चित्रपटानंतर विद्याला एक वेगळी ओळख मिळाली. 2011 मधील द डर्ट्री पिक्चर या चित्रपटातील विद्याचा अभिनय थक्क करायला लावणारा होता. या चित्रपटासाठी विद्याने भरपूर वजन वाढवलं होतं. त्यानंतर तिचं वाढलेलं वजन चर्चेचा विषय बनला होता. यावरुन विद्याला सोशल मिडियावरुन नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं होतं. मात्र बऱ्याच कालावधीनंतर विद्याने या गोष्टीवर वक्तव्य केलं आहे. विद्या म्हणाली, एक काळ असा होता की, मी स्वत:हा शरिराचा तिरस्कार करायची, कारण मी या सगळ्या गोष्टी मान्य करु शकत नाही

''मी जे केले त्यामधून जाणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. या सगळ्या गोष्टी सार्वजनिक होत्या आणि खूप अपमानास्पदही होत्या. माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य चित्रपटसृष्टीत नाही. त्यावेळी मला हे सगळ काही दिवसांमध्ये थांबेल असं सांगणार कोणी नव्हतं. माझ वाढत वजन राष्ट्रीय मुद्दा बनला होता,'' असं विद्या म्हणाली.

तापसी-अनुरागने चित्रीकरणाला केली सुरुवात?

पुढे म्हणाली, ''मी आधीपासून अंगाने लठ्ठ मुलगी आहे. मी असं म्हणणार नाही की, माझं वाढत वजन मला त्रास देत नाही. त्यानंतर आता मी खूप पुढे आली आहे. मला आधीपासून हार्मोनल बॅलन्सची समस्या आहे. बरेच दिवस मी माझ्या शरिराचा तिरस्कार केला होता. मला सतत वाटायचं की, माझं शरीर धोका देत आहे. ज्या दिवशी माझ्यावर चांगलं दिसण्याचा दबाव होता त्याचवेळेस माझ वजन वाढलं जात होतं. हे सर्व पाहून आणखी नैराश्याचा सामना करत होते. शेवटी ही गोष्ट मी मान्य केली परंतु मला या गोष्टीसाठी बराच वेळ लागला.’’

दरम्यान इश्किया, द डर्ट्री पिक्चर, कहानी, मिशन मंगल या चित्रपटातील विद्याच्या भूमिका खूप गाजल्या आहेत.   
 

संबंधित बातम्या