Gangubai Kathiawadi : आलिया भट्ट गाणार स्पेशल सॉंग, भंसाली स्वत: करणार कंपोजिंग
Gangubai Kathiawadi Alia Bhatt will sing a special song Bhansali will compose this song

Gangubai Kathiawadi : आलिया भट्ट गाणार स्पेशल सॉंग, भंसाली स्वत: करणार कंपोजिंग

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मल्टी टॅलेंटेड मानले जाते. अभिनय आणि नृत्य व्यतिरिक्त ती तिच्या गायनाविषयीही बर्‍याचदा चर्चेत राहते. आलियाच्या आगामी चित्रपटात तीचे हे टॅलेंट दिसू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय लीला भन्साली यांच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया एक गाणं गाऊ शकते. भन्साळी हे खास गाणे ते स्वतः संगीतबद्ध करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट चांगली गायिका आहे. तर भन्साली स्वत: एक प्रसिद्ध संगीतकार आहेत. अशा परिस्थितीत चित्रपटात एक चांगले कंपोजिशन पाहिले आणि ऐकले जाऊ शकते. या दोघांनीही या खास गाण्यासाठी योजना आखली आहे. आलियाने यापूर्वी हम्प्पी शर्माच्या दुल्हनियापासून इतर बऱ्याच सिनेमांमध्ये आलियाने आपले सिंगिंग टॅलेंट दाखवले आहे. बद्रीनाथ की दुल्हनिया मधील 'हमसफर' आणि उडता पंजाबमधील एकता कुडीमध्ये दिलजित दोसांझ यांच्यासमवेत तीने गाणे गायले आहे. आलियाचे मैं तैनु समझावाचे अनप्लग वर्जन चे चाहत्यांनी खूप कौतुक केले.  ती आगामी ‘सडक 2’ या चित्रपटातही गाण गाऊ शकते असे सांगण्यात येत आहे.

नुकताच गंगूबाई काठियावाडीचा टीझर लाँच झाला. ज्याला प्रेक्षकानी खूप प्रतिसाद दिला आहे. सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूडमधील शाहरुख खान, अक्षय कुमार, फरहान अख्तर, प्रियांका चोप्रा, राम चरण, एस.एस. राजामौली आणि वरुण धवन अशा अनेक नामांकित सेलिब्रिटींनी या टीझरचे कौतुक केले आहे.

गंगूबाई काठियावाडी हे हुसेन जैदी यांच्या मुंबईतील माफिया क्वीन्स या कादंबरीतील एका अध्यायावर आधारीत आहे. यात गंगूबाई काठियावाडी यांच्या संघर्षाची कहाणी पडद्यावर दाखविली जाणार आहे. ती मुंबईची एक सुप्रसिद्ध कोठेवाली होती, तिला तिच्या पतीने फक्त 500 रुपयात विकले होते. यानंतर, तीने स्वत: ला कसे हाताळले? याचे वर्णन या चित्रपटात बघायला मिळणार आहे.  या चित्रपटाद्वारे संजय लीला भन्साली आणि आलिया भट्ट प्रथमच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट व्यतिरिक्त अजय देवगन आणि विक्रांत मस्से देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com