अमेरिकेच्या ‘बिलबोर्ड २००’ रँकिंगमध्ये ‘बीटल्स’नंतर आता ‘बीटीएस’

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

General अमेरिकेतील सर्वांधिक लोकप्रिय म्युझिक अल्बमच्या ‘बिलबोर्ड २००’ रँकिंगमध्ये कोरियाच्या ‘बीटीएस’ ग्रुपने पाचव्यांदा अव्वल स्थान मिळविले आहे. असे यश यापूर्वी ६०च्या दशकात बीटल्स ग्रुपला मिळाले होते.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील सर्वांधिक लोकप्रिय म्युझिक अल्बमच्या ‘बिलबोर्ड २००’ रँकिंगमध्ये कोरियाच्या ‘बीटीएस’ ग्रुपने पाचव्यांदा अव्वल स्थान मिळविले आहे. असे यश यापूर्वी ६०च्या दशकात बीटल्स ग्रुपला मिळाले होते.

सलग पाच अल्बमसह 'बिलबोर्ड २००' वर असलेला शेवटचा गट म्हणजे 'बीटल्स'. 30 जुलै 1966 ते 28  डिसेंबर 1968 दरम्यान पाच वेळा प्रथम क्रमांकावर असलेल्या या बँडने केवळ एक वर्ष पाच महिन्यांत क्रमांक १ मिळविण्याचा विक्रम केला आहे.

बीटीएसला नंबर 1 च्या जागेवर आपला हक्क सांगण्यास दोन वर्षे आणि सहा महिने लागले. त्यांच्या शर्यतीची सुरूवात  2018 मध्ये ‘लव्ह युअर सेल्फः टियर’ पासून सुरू झाली, त्यानंतर ‘लव्ह युअर सेल्फ: आन्सर’, ‘मॅप ऑफ सोल : पर्सोना’, आणि ‘मॅप ऑफ सोल 7' हे जगप्रसिद्ध झाले.

 

अधिक वाचा :

कुला नं वन च्या रिमेक चा ट्रेलर बघून चाहते संतापले

मल्लिका शेरावतने बॉलिवूडमध्ये यायच्या आधीच केलं होतं लग्न 

संबंधित बातम्या