Ghum Hai Kisikey Pyaar Meiin
Ghum Hai Kisikey Pyaar MeiinDainik Gomantak

Mumbai फिल्मसिटीमध्ये मोठी दुर्घटना, 'गुम है किसी के प्यार में'च्या सेटला भीषण आग

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin: खरे तर, नील भट्ट, आयशा सिंह आणि ऐश्वर्या शर्मा स्टारर शोच्या सेटवर मोठी आग लागली आहे.

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin: नील भट्ट आणि आयशा सिंह स्टारर 'गुम है किसी के प्यार में' प्रत्येक घराघरात पाहायला मिळते. आजच्या काळात 'अनुपमा' नंतर ही मालिका लोकांची पहिली पसंती आहे. टीआरपीमध्ये रुपाली गांगुली अभिनीत शोला टक्कर देणारी ही मालिका रोजच चर्चेत असते.

काहीवेळा ही मालिका ट्रॅकमध्ये वारंवार येणाऱ्या ट्विस्ट आणि टर्नमुळे तर कधी मालिकेतील स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हेडलाइन्स मिळवते. पण, आज स्टार प्लसची प्रसिद्ध मालिका 'गुम है किसी के प्यार में' वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. खरे तर, नील भट्ट, आयशा सिंह आणि ऐश्वर्या शर्मा स्टारर मालिकेच्या सेटवर मोठी आग लागली आहे.

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin
Salman Khan Viral Video: सतीश कौशिक यांच्या निधनानंतर भाईजान भावूक; पाहा व्हायरल व्हीडीओ

आग लागली

आता, या मलिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यात स्टार्स आणि कथेबाबत सोशल मीडियावर नेटिझन्सनी निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे, मुंबई (Mumbai) फिल्मसिटीमध्ये 'गुम है किसी के प्यार' या मालिकेच्या सेटला भीषण आग लागली.

पूर्व गोरेगाव येथील फिल्मसिटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सेटला लागलेली आग आजूबाजूच्या इतर अनेक सेटमध्ये पसरत आहे. आत्तापर्यंत आग 'तेरी मेरी दूरियाँ' आणि 'अजुनी' या मालिकांच्या सेटवर पोहोचली आहे. घटनेच्या वेळी तिन्ही मालिकांच्या सेटवर सुमारे हजार लोक काम करत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com