The Girl on The Train अ‍ॅक्टिंगपासून ते डायरेक्शन पर्यंत घसरली चित्रपटाची गाडी

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

परिणीती चोप्राच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाबाबतही असेच काहीसे झाले आहे. चित्रपटाची ट्रेन पूर्णपणे रुळावर आली असल्याचे दिसते आणि या परिस्थितीमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांपुढे प्रेझेंट करणे खूप अवघड होते. 

नवी दिल्ली : द गर्ल ऑन द ट्रेन मूव्ही रिव्यूः मागील काही काळात असे दिसून आले आहे की ओटीटी प्लॅटफॉर्मवर जे काही चित्रपट रिलीज होत आहेत ते कंटेंट, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या दृष्टिकोनातून कमकुवत होत आहेत. हे पाहून असे दिसते की निर्माते काही प्रमाणात ओटोटी प्लॅटफॉर्मवर ते चित्रपट विकायचा प्रयत्न करीत आहेत, ज्याबद्दल त्यांना विश्वास आहे की ते चित्रपटगृहात चालू शकत नाहीत. परिणीती चोप्राच्या 'द गर्ल ऑन द ट्रेन' चित्रपटाबाबतही असेच काहीसे झाले आहे. चित्रपटाची ट्रेन पूर्णपणे रुळावर घसरली असल्याचे दिसते आणि या परिस्थितीमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांपुढे प्रेझेंट करणे खूप अवघड होते. 

या चित्रपटाची कथा परिणीती चोप्रा आणि अविनाश तिवारी यांची आहे. परिणीती चोप्रा या चित्रपटात वकील आहेत. ती एक केस घेते ज्यामध्ये मोठी रिस्क असते. या चित्रपटात अविनाश तिचा नवरा झाला आहे, त्याने ही केस घेण्यास नकार दिला आहे, पण तिला त्याचं हे म्हणण पटत नाही. ती ही केस जिंकते परंतु ती गर्भवती असते आणि या केस च्या कामात तीचा अपघातात होतो आणि तीला आपले मूल गमवावे लागते. अशाप्रकारे परिणीती आणि अविनाशच्या नात्यात तफावत दुरावा निर्माण होते. दोघांचे मार्ग वेगळे होतात. अशातच परिणीतीला मद्यप्राशन करण्याची सवय लागली असते. आणि मग ट्रेनचा प्रवास सुरू होतो, ज्यामध्ये एक घटना दाखविली जाते आणि तेथूनच परिणीतीचे जीवन रुळावर खाली उतरू लागते. चित्रपटाच्या कथेत अनेक ट्विस्ट्स आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण दिग्दर्शन खूपच कमकुवत आहे आणि कथेत एक धक्कादायक घटक जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण ती आश्चर्य वाटण्यासारखी आजिबात नाही. 

परिणीती चोप्रा या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत आहे आणि मीरा कपूरची व्यक्तिरेखा साकारण्यात ती पूर्णपणे अयशस्वी ठरली आहे. परिणीती चोप्रा ला या पात्राची वैशिष्ट्ये हस्तगत करण्यात अपयश आले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. 

रेटिंग : १/5 स्टार
दिग्दर्शक: रिभू दासगुप्ता
कलाकार: परिणीती चोपडा, अदिती राव हेयडारी, कीर्ती कुल्हारी आणि अविनाश तिवारी

संबंधित बातम्या