ग्लोबल इन्स्टाग्राम यादीमध्ये पंतप्रधान मोदींपेक्षाही विराट पुढे

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 15 डिसेंबर 2020

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 वा क्रमांकावर आहेत तर या यादीत 25 मध्ये स्थान मिळविणारा विराट कोहली हा पहिला भारतीय ठरला आहे. विराट कोहली 11 व्या क्रमांकावर आहे..

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा नवरा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या ऐकमेंकाबरोबर वेळ घालवत आहेत. विराट आणि अनुष्का दोघेही नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर करत असतात. दरम्यान, जगभरातील इन्स्टाग्रामवरील प्रसिध्द व्यक्तींची यादी जाहिर झाली आहे. या यादीत अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने पहिल्या 25 मध्ये आपले स्थान मिळवले आहे. (Global Instagram Influencers Anushka Sharma and Virat Kohli in the top 25)

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, दीपिका पादुकोण आणि कॅटरिना कैप यांची नावेही टॉप 50 च्या यादीत आहेत. प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोला प्रथम स्थान मिळाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 17 वा क्रमांकावर आहेत तर या यादीत 25 मध्ये स्थान मिळविणारा विराट कोहली हा पहिला भारतीय ठरला आहे. विराट कोहली 11 व्या क्रमांकावर आहे..

अनुष्का शर्माच्या प्रत्येक पोस्टवर 2.6 मिलियन ऑथेंटिकेट इंगेजमेंट होते. आणि  बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये अनुष्का शर्मा सर्वात पुढे आहे. अनुष्काला या यादीत 24 वा क्रमांक मिळाला आहे.. तर कतरिना 43 व्या स्थानावर आहे, आणि दीपिकाने 49 वा क्रमांक मिळवला आहे.

अलीकडेच अनुष्का आणि विराटने त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी सोशल मिडिसावर अनुष्काने एक फोटो शेअर केला होता, त्यामध्ये अनुष्का विराटला मागून मिठी मारताना दिसत होती. तो फोटो शेअर करताना अनुष्काने लिहले होते की, आपल्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत, आणि आता आपण तीन होणार आहोत.

प्रेग्नेंसी होम टेस्ट किट बनविणारी आघाडीची कंपनी प्रेगा न्यूजने आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. पूर्वी त्याची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर करिना कपूर खान होती. यावेळी कंपनीने करिना ऐवजी अनुष्काची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. करिना ऐवजी अनुष्काला कंपनीने ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. 

 ‘प्रेगा न्यूज’ होम प्रेग्नन्सी टेस्ट किटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या बदलाचे एक कारण असेही असु शकते की अनुष्का पहिल्यांदाच आई होणार असल्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीबद्दल मीडियामध्ये जास्त चर्चा आहे.

 

संबंधित बातम्या