गोव्याचा ‘डिकॉस्टा हाऊस’ आज इफ्फीत

‘डिकॉस्टा हाऊस’ हा एक थरारपट आहे.
गोव्याचा ‘डिकॉस्टा हाऊस’ आज इफ्फीत
गोव्याचा ‘डिकॉस्टा हाऊस’ आज इफ्फीत Dainik Gomantak

इफ्फीतल्या (IFFI) गोवा विभागातील चित्रपटांना आजपासून सुरुवात होत आहे. आज ‘डिकॉस्टा हाऊस’ (D'costa House) या कोकणी चित्रपटाचा प्रीमियर आयनॉक्सच्या तीन क्रमांकाच्या चित्रपटगृहात साडेपाच वाजता होणार आहे. चित्रपटातील तंत्रज्ञांना ‘रेड कार्पेट’ (Red carpet) चा सन्मानही यावेळी लाभणार आहे.

‘डिकॉस्टा हाऊस’ हा एक थरारपट आहे. तीन गुन्हेगार तुरुंगातून पळून जातात आणि एका घरात आसरा घेतात. घरातल्या सदस्यांना ओलीस ठेवले जाते पण पुढे ज्या घटना घडतात त्यातून एक प्रश्न दर्शकांच्या मनात सतत उद्भवत राहतो- घरातले सदस्य बाजी उलटवणार की अनिष्टाची छाया अधिकच गडद होणार? या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे, जितेंद्र शिकेरकर. चित्रपटाबद्दल सांगताना जितेंद्र म्हणाला की हा सिनेमा करतानाचा सारा काळ अनिश्चिततेचा होता. कोरोनामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले होते. तरीसुद्धा चित्रपटाच्या निर्मात्या प्रमोद साळगावकर या निर्मितीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांच्या सहकार्यामुळेच हा चित्रपट वेळेत पूर्ण होऊ शकला.या चित्रपटात प्रिन्स जेकब, राजदीप नाईक, रोजफर्न्स, चित्रा अल्फान्सो, रोहित खांडेकर, वेलोश्का दा’कोस्टा, मीना गोयस, क्लिफ बार्बोसा व संकेत भंडारी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

गोव्याचा ‘डिकॉस्टा हाऊस’ आज इफ्फीत
सत्‍यजीत रे कॅमेऱ्याच्या लेन्समधून व्यक्तिरेखांच्या मनोभूमिकेत उतरायचे

या चित्रपटाची कथा आणि पटकथा स्वतः दिग्दर्शक जितेंद्र शिकेरकर यांनी लिहिली आहे. छायाचित्रण पॅटसन बार्बोजा यांचे आहे. चित्रपटाचे संकलन रामप्रसाद आडपईकर यांनी केले आहे आणि चित्रपटाला संगीत रॉनी मोन्सेरात यांनी दिले आहे. चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत जॉन आगियार यानी व ती गायली आहेतअल्डिया रोज डिसोजा यांनी. पार्श्वसंगीत आहे सिंधुराज कामत यांचे. हा संपूर्ण चित्रपट गोव्यात (Goa) बनला आहे. फक्त ध्वनी आरेखनाची व्यवस्था गोव्यात नसल्यामुळे तो भाग मुंबईत (Mumbai) पूर्ण करण्यात आला.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com