गोव्याला आहे 'फिल्म स्कूलची' गरज

‘फिल्म फायनान्स’चे पाठबळ लाभल्यावर मात्र गोव्यात (Goa) सिनेमा थोड्या अधिक गतीने निर्माण व्हायला लागले.
गोव्याला आहे फिल्मस्कूलची गरज
गोव्याला आहे फिल्मस्कूलची गरजDainik Gomantak

गोवा सरकार (Goa Government) स्थानिक सिनेमांसाठी (Movie) देत असलेले अनुदान फार अलीकडचे. या अनुदानाचा पत्ता नसताना देखील गोव्यात (Goa) चित्रपट निर्मिती सुरू झाली होती. गोव्यात इफ्फी (IFFI) सुरू झाला त्या वर्षी दोन कोंकणी सिनेमा त्यात दाखवले गेले होते. एक, राजेंद्र तालक यांचा ‘आलिशा’ आणि दुसरा, संजीव प्रभुदेसाई यांनी निर्माण केलेला, ‘सूड’. त्यावेळी अनुदानाची चाहूल नसतानाही त्यांनी सिनेमा (ते देखील सॅल्युलोईड, 35 मिलिमीटर फॉरमॅटमध्ये) निर्माण करण्याचे धाडस केले होते. त्याचप्रमाणे इतर फॉरमॅटवरही चित्रपट (Movie) बनत होतेच. जसे, ‘काट्यातले फुल’ वगैरे. हे सिनेमा त्यांच्या निर्मात्यांनी त्याना वाटणाऱ्या ‘सिनेमां’च्या आवडीतून बनवले होते. ‘फिल्म फायनान्स’ ही योजना फार नंतरची.

‘फिल्म फायनान्स’चे पाठबळ लाभल्यावर मात्र गोव्यात (Goa) सिनेमा थोड्या अधिक गतीने निर्माण व्हायला लागले. वर्षाला पाच ते सहा सिनेमा (Movie) तयार होऊ लागले आणि यातले काही सिनेमा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातूनही झळकले. काहीना राष्ट्रीय पारितोषिकेही मिळाली. गोवा सरकारच्या ‘फिल्म फायनान्स’च्या (Film Finance) पाठबळाने आजवर चाळीसेक चित्रपट तरी बनले असतील. त्यातले दहा तरी चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवात (बर्लिन, शांघाय, हॉंगकॉंग, मामी, केरळ, कलकत्ता वगैरे) दाखवले गेले आहेत. काही चित्रपटांना प्रतिष्ठेच्या चित्रपट महोत्सवात (Film Festival) स्थान मिळाले नसले तरी त्यातले किमान पाच चित्रपट चांगलेच होते. गोव्यात ‘फिल्म फायनान्स’ योजना सुरू झाल्यापासून निर्माण झालेल्या या 40 चित्रपटांमध्ये 15 चित्रपट चांगल्या दर्जाचे असणे, हे प्रमाण खूपच चांगले व बोलके आहे. भारतात (India) निर्माण होणाऱ्या सिनेमांपैकी केवळ चार ते पाच टक्के सिनेमा हे बरे म्हणण्याइतपत दर्जाचे असतात. त्या मानाने गोव्यातली सिनेमा निर्मिती दर्जेदारच होती असे म्हणावे लागेल. अर्थात गोवा सरकारच्या ‘फिल्म फायनान्स’ योजनेशिवाय हे होणे शक्य नव्हते.

मुळात कोकणी चित्रपटाला प्रेक्षकांची संख्या ही फार कमी आहे. गोव्यातल्या कोकणी भाषिकांची संख्या अवघ्या लाखांची असल्यामुळे चित्रपट थिएटरमध्ये लावूनही पैसे भरून येण्याची फारशी आशा नसते. सरकारडून 50 % (ते सुद्धा पूर्ण नव्हेत. त्यातही वर्गवारी आहे) मिळूनही निर्मात्यांनी सिनेमात गुंतवलेले पैसे, फायदा सोडाच, परत मिळतील अशी आशा नाही. किंबहुना आतापर्यंत असे फक्त चार-पाच चित्रपट असतील ज्यांचा, ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (International Film Festival) दाखवले गेल्यामुळे व गोवा सरकारकडून त्यांना पुरस्कारादाखल अधिक पैसे मिळाल्यामुळे, खर्च भरून आलेला आहे. गोमंतकीय निर्माता हा सिनेमात जेव्हा पैसे घालतो तेव्हा ‘व्यवसाय’ हे त्याचे उद्दिष्ट कधीच नसते पण ‘सिनेमा’ या माध्यमाचे आकर्षण त्याला या माध्यमात आपली गुंतवणूक करायला भाग पाडते.

गोव्याला आहे फिल्मस्कूलची गरज
Vicky-Katrina Wedding: लग्नानंतर विकी-कतरिना जाणार 'या' मंदिरात

‘ईएसजी’कडून गेली काही वर्षे ‘फिल्म फायनान्स’ योजनेत खंड पडल्यामुळे गेल्या दोन वर्षात, एक-दोन सिनेमा (Movie) सोडून निर्मिती झालेली नाही. गोवा सरकार एका बाजूला चित्रपटांना दरवर्षी काही कोटींच्या घरात अनुदान देण्यास तयार असते. मात्र चित्रपट निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी मात्र कुठलीच पावले उचलत नाही ही, गोमंतकीय चित्रपट क्षेत्रातली आणखीन एक दुर्दैवी बाब आहे. गोव्यात गेली काही वर्षे एकही सिनेमाविषयक कार्यशाळा आयोजित झालेली नाही. किंबहुना, त्या आपल्या संस्थेकडून आयोजित व्हायला हव्यात याची जाणीव देखील ‘ईएसजी’मधल्या कुणाला नाही अशी शोचनीय परिस्थिती सध्या आहे. मात्र अशा प्रशिक्षणाच्या किंवा सिनेमाविषयक तत्सम सुविधा नसताना देखील, गोव्यातल्या सिनेमा मेकर्सनी (Movie Makers) आपली मुद्रा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवली आहे यातच त्यांचे कर्तृत्व दिसून येते. सिनेमा प्रशिक्षणाच्या दीर्घ किंवा स्वल्प मुदतीच्या कार्यशाळांची गोव्याला अत्यंत गरज आहे. एखादे फिल्म स्कूल (Film School) जर झाले तर सोन्याहून पिवळे. पण त्याबाबत ‘ईएसजी’त आज काय वातावरण आहे त्याबद्दल उद्या!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com