गोव्यातील चित्रपटगृहे लगेच खुली होणार नाहीत

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

देशातील सिनेमागृहे  १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठीची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र याबाबतीत सिनेमागृहांच्या मालकांनी मात्र लगेच चित्रपटगृहे उघडण्याबाबत नकार दर्शविला आहे.

पणजी : देशातील सिनेमागृहे  १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठीची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र याबाबतीत सिनेमागृहांच्या मालकांनी मात्र लगेच चित्रपटगृहे उघडण्याबाबत नकार दर्शविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमागृहात रिलीज करण्यासाठी नवीन चित्रपटच रिलीज झालेले नसल्याने सिनेमागृहांचे मालक सिनेमागृहे उघडण्याबाबत साशंक आहेत. 

दरम्यान देशभरात रिलिज झालेले चित्रपट निर्मात्याकरवी नेटफ्लिक्स आणि अमेझॉनसारख्या माध्यमांचा विचार चित्रपट रिलिज करण्याबाबत होताना दिसून येत आहेत. कारण लोकांच्या मनात कोरोनाची भीती आहे. लोक सिनेमा गृहात येऊन चित्रपट पाहतील कि नाही याबद्दल अनेकजण संदिग्ध अवस्थेत आहेत. ही परिस्थितीही या निर्णयाला कारणीभूत असू शकत असल्याचे मत सिनेमा प्रेमींमध्ये व्यक्त होताना दिसून येत आहे.

नाटकांचीही हीच अवस्था असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान राज्यातील थिएटर असोसिएशनचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार प्रवीण झांटये यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, अद्याप दिल्ली, महाराष्ट्र आणि राजस्थान येथील थिएटरही उघडलेले नाहीत. जोपर्यंत चित्रपट रिलिज होत नाहीत तोपर्यंत आम्ही सिनेमागृहे उघडणार नाही.

संबंधित बातम्या