प्रकृती सुधारल्यानंतर श्वेता तिवारी रेयांशसह गोव्याला रवाना
Goa Trip of Shweta Tiwari After health recovering Dainik Gomantak

प्रकृती सुधारल्यानंतर श्वेता तिवारी रेयांशसह गोव्याला रवाना

अभिनेत्री श्वेता तिवारी गोव्यात जावून साजरा करणार आपला 41वा वाढदिवस

मुंबई: टीव्ही स्टार (TV Star) अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) आपला मुलगा रियंशसोबत (Reyansh) दिसली. गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये ते दोघे दिसले. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल श्वेता ने तीच्या पप्पांचे आभार मानले आणि त्यांना विनंती केली की ती तिला जाऊ दे कारण तिची फ्लाइट चुकवू शकते. नुकतीच प्रकृती सुधारल्यानंतर ही अभिनेत्रीची पहिली गोवा ट्रिप (Goa Trip) आहे. श्वेताला काही दिवसांपूर्वी थोड्या प्रमाणात कमजोरी जाणवत होती. कमी रक्तदाबामुळे अभिनेत्रीला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.

Goa Trip of Shweta Tiwari After health recovering
अरे बाबांनो मी फक्त नावाचाचं नवाब! सैफ अली खान

श्वेताच्या चाहत्यांनी तिच्या आरोग्याची चौकशीही केली होती. म्हणून अभिनेत्रीच्या टीमने एक निवेदन जारी करून तिच्या प्रक़तीबाबत खुलासा केला होता. “आम्हाला श्वेता तिवारीच्या प्रकृतीबद्दल बरेच कॉल आणि संदेश येत आहेत. तेव्हा सर्वांना कळवण्यात येत आहे की, श्वेता तिवारीला अशक्तपणा आला आहे आणि थोडा कमी दाबामुळे तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जास्त प्रवासामुळे आणि हवामानातील बदलामुळे श्वेताने पुरेशी विश्रांती घेतली नव्हती. म्हणून ती आजारी पडली आहे. तिच्या साठी येणाऱ्या सर्वांच्या प्रेम आणि शुभेच्छांसाठी आम्ही तुमचे आभार मानतो. ती लवकरच बरी होईल." अशी माहिती निवेदनात देण्यात आली होती.

Goa Trip of Shweta Tiwari After health recovering
मलायका अरोरा वयाच्या 47 व्या वर्षीही दिसते ग्लॅमरस; पाहा Photo

टीव्ही इंडस्ट्रीतील तिच्या अनेक मित्रांनी तिला लवकर बरे व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. श्वेता तिवारीचा पहिला नवरा अभिनव कोहलीनेसुद्धा तिला गेटवेल सून म्हटले होते. आता श्वेता अखेर बरी झाली आहे आणि उशीरा का होईना पण आता ती वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्याकडे निघाला आहे. श्वेता 4 ऑक्टोबर रोजी 41 वर्षांची झाली. श्वेताकडून वाढदिवस साजरा करण्याची कोणतीही चिन्हे नव्हती आणि मात्र तिचा गोवा प्रवास अचानक ठरल्याने श्वेता आता गोव्यात जावून वाढदिवस साजरा करणार की काय असा तर्क लावला जात आहे. अर्जुन बिजलानीने जिंकलेल्या खतरों के खिलाडी सीझन 11 च्या रिअॅलिटी शोमध्ये श्वेता शेवटची स्पर्धक म्हणून दिसली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com