Golden Globe Awards: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात 'RRR' ची धुम; 'नाटू नाटू' ने पटकावला अवॉर्ड, पाहा व्हिडिओ

बेस्ट ओरिजिनल साँग पुरस्कार 'आरआरआर' (RRR) मधील नाटू नाटू या गाण्याने पटकावला आहे.
Golden Globe Awards 2023
Golden Globe Awards 2023Dainik Gomantak

Golden Globe Awards 2023: टॉलिवूडमधील 'आरआरआर' या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार ( Golden Globe Awards 2023) सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमध्ये नामांकने मिळाली आहेत. आरआरआरमधील 'नाटू-नाटू' (Naatu Naatu) गाण्याला या सुपरहिट गाण्याला मोशन पिक्चर कॅटगिरीमधील बेस्ट ओरिजिनल साँग आणि बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) ही दोन नामांकने आरआरआर या चित्रपटाला मिळाली आहेत. यामधील मोशन पिक्चर कॅटगिरीमधील बेस्ट ओरिजिनल साँग हा पुरस्कार 'आरआरआर' मधील नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे.

संगीतकार एम एम कीरावानी यांनी स्टेजवर जाऊन हा पुरस्कार (Award) स्विकारला. यावेळी आरआरआर (RRR) चित्रपटाच्या टीमनं टाळ्यांचा कडकडाट केला.

बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही आरआरआरच्या ‘नाटू नाटू’ ला बेस्ट ओरिजिनल साँग मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. 

हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ‘आरआरआर’ चे दिग्दर्शक एसएस राजामौली, अभिनेता राम चरण, जूनियर. एनटीआर आणि त्यांची पत्नी या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते. ‘आरआरआर’ या चित्रपटात साऊथ सुपरस्टार (South Superstar) राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आलिया भट्ट देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहेत. या चित्रपटाला (Movie) गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-इंग्रजी चित्रपट म्हणून, तर याच चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचे नामांकन मिळाले होते.

‘आरआरआर’ या चित्रपटाने भारतात (India) धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट परदेशातही आपली जादू दाखवत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाने बाजी मारली आहे. जेव्हा हा चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांनी तिथल्या चित्रपटगृहांमध्ये जाऊन चाहत्यांची भेट घेतली. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्टसह श्रिया सरन, अजय देवगण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com