गॉन गर्ल फेम एक्ट्रेस लीजा बेन्स यांच निधन

गॉन गर्ल फेम एक्ट्रेस लीजा बेन्स यांच निधन
Lisa Banes

न्यूयॉर्क(New York) शहरातील हिट-अँड-रन अपघातानंतर गॉन गर्ल(Gone Girl) स्टार लिजा बेन्स(Lisa Banes) यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेत्री लिजा बेन्स यांचे काही दिवसांच्या उपचारानंतर निधन झाले आहे. न्यूयॉर्कमधील मॅनहॅटनच्या अप्पर वेस्ट साइडमध्ये 4 जूनला हा अपघात झाला होता.(Gone Girl fame actress Lisa Banes pass away)

त्याच्या प्रतिनिधीने या घटनेची माहिती मिडियाला दिली आहे. ते म्हणाले, “लिजा बैन्स यांच्या निधनाने आम्ही दु: खी आहोत. ती एक महान, दयाळू, आणि उदार विचारांची ची स्त्री होती याहीपेक्षा ती चांगली मैत्रिण, एक कुटुंब सदस्य आणि एक उत्तम पत्नि होती. ती तिच्या कामाबाबत समर्पित भावना ठेवयाची, मग ती स्टेजवर असो किंवा कॅमेर्‍यासमोर."

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, रेड आणि ब्लॅक स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीने आधी एका लाल दिव्याला धडक दिली त्यानंतर लिजालाही धडकत उडवले. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्कूटर चालक पळून गेला होता. या अपघातात लिजा गंभीर जखमी झाली होती. त्याचबरोबर पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आरोपी अद्याप त्यांच्या ताब्यात आला नाही. लिजा जिलियर्ड स्कूलकडे जात असताना अ‍ॅमस्टरडॅम अव्हेन्यू ओलांडत असताना हा अपघात झाला. 

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचे नाव घेतले नाही किंवा या प्रकरणात कोणत्याही अटकसंदर्भात माहिती दिला नाही. बेन्सने बर्‍याच टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये तिला गॉन गर्ल आणि टॉम क्रूझसह आलेल्या कॉकटेल या चित्रपटापासून वेगळी ओळख मिळाली होती. टीव्ही शोबद्दल सांगायचं झालं तर लिजाने नैशविले, मैडम सेक्रेटरी, मास्टर्स ऑफ सेक्स आणि NCIS या कार्यक्रमात काम केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com