गुगलकडून भारतीयांसाठी ग्रँड 'न्यु इयर पार्टी'चे आयोजन; तुम्हालाही या सेलिब्रेशनमध्ये भाग घेता येईल, कसा? वाचा....

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 30 डिसेंबर 2020

'हेलो 2021 इंडिया' असे नाव या पार्टीला देण्यात आले असून 31 डिसेंबरला मध्यरात्री ११ वाजेपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

कोरोनामुळे २०२० हे वर्ष कायमचं सर्वांच्या स्मृतीत कोरलं गेलं आहे. घराच्या बाहेर पडता येत नाही म्हणून कित्येक गोष्टी आभासीच झाल्या. अनेक  शिक्षणापासून ते खेळापर्यंत असंख्य गोष्टी या फक्त स्क्रीनवर बघाव्या लागल्या किंवा शिकाव्या लागल्या. आता काही तासांमध्येच नवीन वर्षाची सुरूवात होणार असून या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुगलनेही स्क्रीनवरच नवीन वर्षाची पार्टी आयोजित केली आहे. 'हेलो 2021 इंडिया' असे नाव या पार्टीला देण्यात आले असून 31 डिसेंबरला मध्यरात्री ११ वाजेपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफ, रॅपर बादशाह, गायिका जोनिता गांधी कार्यक्रमात आपली कला सादर करणार असून कॉमेडियन झाकिर खान हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.

या कार्यक्रमासाठी गुगलने पार्टी पॉपर आयकॉनही लॉन्च केला आहे. निळ्या आणि पिवळ्या रंगाचा हा पार्टी पॉपर ‘New Year's Eve'असं गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला सेलिब्रेशन मोडमध्ये नेणार आहे. तुमच्यावर काही सेकंदांसाठी आभासी पाकळ्यांचा वर्षावही होणार आहे. या पार्टीपॉपरवर तुम्ही असंख्य वेळा क्लिक करून 'व्हर्च्यूअल सेलिब्रेशन'चा मनसोक्त आनंद घेऊ शकता.   

ही आभासी पार्टी युट्युबवर होणार असून या पार्टीत तुम्हाला सहभाग नोंदवण्यासाठी काही गोष्टी सर्च कराव्या लागतील. गुगलच्या एका नवीन पानावर तुम्ही ‘I'm Feeling Lucky' टाईप केल्यास गुगल तुम्हाला युट्युबच्या नवीन वर्षाच्या कार्यक्रमासाठी गुगल तुम्हाला जॉईन होण्याचं सजेशन देईल किंवा थेट युट्य़ुबवर जाऊन तुम्ही 'हेलो 2021 इंडिया' असे सर्च केल्यास तुम्ही कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल.  

युट्युब ओरिजीनलकडून ही व्हर्च्युअल न्यू इयर पार्टी आयोजित करण्यात आली आहे. काही मोठ्या सेलिब्रिटींव्यतिरिक्त गायिका आस्था गिल, बेनी दयाल, म्युजिकल बँड थाईक्कुदम ब्रिज तसेच अभिनेत्री अलया एफ. हे सुद्धा आपली कला सादर करणार आहेत. तुम्ही उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आजच रिमांयडरही सेट करू शकता.  युट्युब लिंकवर क्लिक केल्यावर सेट रिमांयडर या पॉपअपवर तुम्ही क्लिक करू शकता.    

संबंधित बातम्या