रंगभूमी गाजवलेले नटवर्य कै. वसंत सावकार

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

भाषणाची जुनी प्रत त्यांचे पुत्र डॉ. उल्हास यांनी माझ्याकडे दिली होती. त्यांचे ते भाषण अभ्यासपूर्ण आहे. त्यामध्ये त्यांनी मराठी रंगभूमीचा तसेच गोमंतकीय रंगभूमीचा विशाल पट मांडलेला आहे. गोव्याच्या रंगभूमीचा, उत्सवी नाटकांचा, नाट्यसंस्थांचा व कलाकारांचा आढावाही त्यात घेण्यात आला आहे.

भाषणाची जुनी प्रत त्यांचे पुत्र डॉ. उल्हास यांनी माझ्याकडे दिली होती. त्यांचे ते भाषण अभ्यासपूर्ण आहे. त्यामध्ये त्यांनी मराठी रंगभूमीचा तसेच गोमंतकीय रंगभूमीचा विशाल पट मांडलेला आहे. गोव्याच्या रंगभूमीचा, उत्सवी नाटकांचा, नाट्यसंस्थांचा व कलाकारांचा आढावाही त्यात घेण्यात आला आहे. रंगभूमीसंदर्भात संशोधन करू इच्छिणाऱ्यांसाठी ते भाषण निश्चितच मार्गदर्शनपर ठरू शकते; एवढी विस्तृत तथा अभ्यासपूर्ण माहिती त्यात आहे.

म्हापसा शहरात संगीताची व रंगभूमीची सेवा पाच पिढ्या करणारे एक घराणे म्हणजे सावकार घराणे केवळ गोव्यातच नव्हे, तर मराठवाडा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बेळगाव, हुबळी, गदग, धारवाड, विजापूर बागलकोट अशा सर्व ठिकाणी सावकार घराण्यातील काही पुरुषांनी नाट्य क्षेत्रात चांगल्यापैकी नाव कमावलेले आहे. पहिल्या पिढीतल पुरुष राघोबा सावकार हे १८७०च्या सुमारास मुंबईत वास्तव्य करून होते. ते संगीताचे दर्दी असल्याने दर आठवड्यात मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी संगीताच्या मैफली झडत. त्यात ते स्वत:ही गात. काही जुन्या नाटकांतूनही त्यांनी भूमिका केल्या.

राघोबा सावकर हे रघुवीर सावकार, वसंत सावकार व गोपीनाथ सावकर यांचे चुलत आजोबा. त्यानंतर दुसरी पिढी म्हणजे रघुवीर व दत्ताराम सावकार यांचे वडील नारायण सावकार तसेच वसंत व गोपीनाथ सावकार यांचे वडील अनंत सावकार. या दोघांनी म्हापशातील रंगभूमी चांगलीच गाजवली. तिसऱ्या पिढीतील ‘रंगदेवता’ रघुवीर सावकर हे मुद्राभिनयातील अव्वल दर्जाचे कलाकार होते. त्याच तिसऱ्या पिढीतील वसंत सावकार यांनीही महाराष्ट्रात मराठी, हिंदी, उर्दू नाटकांतून कामे केली आहेत. ते महाराष्ट्रातील ‘रंगबोधेच्छु’ या नाटक कंपनीत होते. तिसऱ्या पिढीतील गोपीनाथ सावकार हे उत्कृष्ट नट व दिग्दर्शकही होते.

त्याचप्रमाणे, रघुवीर सावकार यांचे बंधू दत्ताराम सावकार यांनीही गोमंतकातील नाटकांतून नायकाच्या भूमिका केल्या आहेत. तसेच रंगबोधेच्छु नाट्य समाजातील नाटकांतूनही त्यांनी थोड्याफार प्रमाणात अभिनय केला. त्यानंतर चौथ्या पिढीतील ‘पद्मश्री’ प्रसाद सावकार यांना तर आज सारा महाराष्ट्र ओळखतो. त्याच चौथ्या पिढीतील दत्ताराम सावकार यांचे चिरंजीव विनायक सावकार व मनोहर सावकार यांनी म्हापसा येथील उत्सवांतून उत्कृष्ट भूमिका केल्या. मनोहर सावकार यांनी म्हापसा युवक संघाच्या वतीने नाट्यस्पर्धांत सहभागी होऊन प्रथम क्रमांकाची पारितोषिके संस्थेला मिळवून दिली आहेत. पाचव्या पिढीतील कलाकार संख्येने खूप आहेत व ते अजूनही नाटकांत काम करीत आहेत; परंतु, त्यापैकी काही कलाकार दिवंगत झाले आहेत.

म्हापसा शहर जुन्या काळात गोमंतकाची कलापंढरी म्हणून ओळखली जात होते. हे शहर नाट्यवेडे तर होतेच. याच शहरात ‘रंगदेवता’ रघुनाथ सावकर या एका ज्येष्ठ-श्रेष्ठ रंगकर्मीने स्वत: अद्वितीय कामगिरी बजावून नटधर म्हणून कीर्ती संपादन केली. २४ ऑगस्ट १८९३ रोजी रघुवीर सावकार यांचा जन्म झाला होता. म्हापशातील सुखवस्तू खानदानी घराणे म्हणून सावकार घराण्याचा लौकिक होता. म्हापशातील विठ्ठल मंदिराजवळच्या परिसरात कासारवाडा येथे त्या कुटुंबाचे घर होते. वास्तविक, हे घराणे मुळचे मडगाव परिसरातील नागवे येथील. या घराण्याचे मूळ आडनाव नागवेकर होते. पोर्तुगीज राजवटीत बाटाबाटीच्या काळात हे कुटुंब नागवे येथून सावंतवाडी संस्थानातील रेडी येथे स्थलांतरित झाले. व्यवसायामुळे ‘नागवेकर’चे ‘सावकार’ झाले. सावंतवाडी संस्थानाशी प्रारंभी काळात या घराण्यांचे सलोख्याचे नातेसंबंध होते. तथापि, संस्थानाशी असलेले हे संबंध नंतरच्या काळात बिघडले व त्यामुळे हे घराणे म्हापसा येथे स्यायिक झाले. या कुटुंबातील कर्त्या पुरुषांनी उपजीविकेसाठी विविध व्यवसाय केले; परंतु, नंतर सराफी व्यवसायात स्थिरस्थावर झाले.

वसंत सावकारांचे आजोबा राघोबा दोघेही संगीतप्रेमी असल्याने म्हापसा येथील श्री महारुद्र देवस्थानच्या रामनवमी उत्सवात महारुद्र प्रासादिक संगीत नाटक मंडळीतर्फे होणाऱ्या संगीत नाटकांत ते नित्यनेमाने भूमिका करीत. हा संगीत नाटकांचा वारसा त्यांच्या सुपुत्रांकडे अर्थांत नारायणराव आणि अनंतराव यांच्याकडे परंपरेने आला. नारायणरावांकडून त्यांचे दोन सुपुत्र रघुवीर आणि दत्ताराम यांच्याकडे तो वारसा पुढे आला, तर अनंतरावांचा नाट्यवारसा त्यांच्या सुपुत्रांकडे अर्थांत गोपीनाथ आणि वसंतरावांकडे आला.
 

संबंधित बातम्या