भारतात 200 रूपयांत मिळणारा कुर्ता Gucci ने अडीच लाखांना विकला

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 जून 2021

Gucci पारंपारिक भारतीय कुर्तीसारखा दिसणार “लिनेन काफ्तान” नामक कुर्ता आपल्या वेबसाईटवर लाखों रूपयांना विकत आहे. इटलीमध्ये बनवलेल्या या तागाच्या कपड्यावर नेक आणि स्लिव्जवर फुलांनी भरतकाम केले आहे. Gucci ने ही कुर्ती आपल्या लक्झरी ब्रँडच्या संकेतस्थळावर $ 3,500 वर विकत आहे, जी भारतीय चलनात अंदाजे अडीच लाख रुपये आहे.

नवी दिल्ली: जर कोणी तुम्हाला असे सांगितले की जर तुम्ही कधी अडीच लाखांचा कुर्ता पाहिला आहे तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. खरं तर तुम्ही हे विचारताच तुमच्या मनात येईल की लाखो रुपये किंमतीचा कुर्ता वापरून काय मिळणार आहे? भारतीय संस्कृतीतून प्रेरित, इटालियन फॅशन हाऊस गुची नामक फॅशन कंपनीने नुकतेच आपले काही नवीन 'रेंज ऑफ काफ्तान्स' नावाने एक कुर्ती मार्केटमध्ये लॉन्च केली आहे. मात्र, या कुर्तीची कींमत बघून भारतीय लोक आणि ग्राहक आवाक जाले आहे.  आजकाल जगातील प्रसिद्ध इटालियन फॅशन हाऊस Gucci ही फॅशन कंपनी भारतीय कुर्तीसारखे दिसणारे एक कफान अडीच लाख रुपयांना विकत आहे.  Gucci हा एक महाग परदेशी ब्रँड आहे, परंतु या वेळी तो विकत असलेला कुर्ता सहसा कमी किंमतीत भारतात उपलब्ध आहे. त्यामुळे त्यावर चर्चा होणे आवश्यक होते.(Gucci sells Kaftans for Rs 2 5 lakh)

Wedding Anniversary: लंडनला जाण्यासाठी दुसऱ्याच दिवशी बीग बीने केलं होतं लग्न 

या एका कुर्तीची किंमत USD किंमतीनुसार 2,100 डॉलर्स (भारतीय किंमत दिड लाख) ते 3,500 डॉलर्स (अडीच लाख रुपये) पर्यंत आहे. ह्या कुर्तीचे तब्बल भाव बघून भारतीयांना धक्काच बसला आहे, असं म्हणायला हरकत नाही. Gucci पारंपारिक भारतीय कुर्तीसारखा दिसणार “लिनेन काफ्तान” नामक कुर्ता आपल्या वेबसाईटवर लाखों रूपयांना विकत आहे. इटलीमध्ये बनवलेल्या या तागाच्या कपड्यावर नेक आणि स्लिव्जवर फुलांनी भरतकाम केले आहे. Gucci ने ही कुर्ती आपल्या लक्झरी ब्रँडच्या संकेतस्थळावर $ 3,500 वर विकत आहे, जी भारतीय चलनात अंदाजे अडीच लाख रुपये आहे. पुन्हा एकदा, Gucciच्या कपड्यांच्या किंमतींनी लोकांना आश्चर्यचकित केले. हेच कारण आहे की आता या कुर्तीची चर्चा सर्वत्र होत आहे. Gucci चा 'देसी कुर्ता' अडीच लाखांना विकत असताना लोक किंमत बघून हैराण झाले आहे. जर आपण Gucciची नविन कूर्ती बघतली तर ती तुम्हाला अगदी आपल्या भारतात  सहजपणे कोठेही सापडेल अशी आहे. ही कुर्ती ऑर्गेनिक लिननने तयार केली आहे. आणि या कुर्तीवर सेल्फ-टाइल टैसलने काम केले आहे. पण त्याची किंमत कोणाच्याही विश्वास उडवण्यासाठी पुरेसे आहे.

Flowers Medicine: फुलाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ 

इतर बर्‍याच ब्रँडप्रमाणेच Gucci देखील बर्‍याचदा जगभरातील विविध संस्कृतींनी प्रेरित होत आपले उत्पादन निर्माण करणारी कंपनी आहे. त्यांचे नविन केलक्शन भारतीय पोशाखांसारखेच दिसत आहे भारतीय कुर्तीशी Gucci ची कुर्ती साम्य आहे. Gucci जगभरात त्याच्या हँडबॅग्ज, शूज आणि कपड्यांपासून मेकअपच्या, उपकरणासाठी प्रसिद्ध आहे पण त्यांच्या किंमती खूप जास्त आहेत. यातच Gucciच्या या लिनेन काफ्तानची किंमत पाहून लोक हैराण झाले आहेत आणि सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका व्यक्तीने असेही म्हटले की, हाच कुर्ता भारताच्या प्रत्येक गल्लीत आणि मार्केटमध्ये कमी किंमतीत मिळु शकतो. एका ट्विटर युजरने कफतानाचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ”गुची भारतीय कुर्ता अडीच लाखात विकतो? आणि मला तो 500 रुपयांमध्ये मिळतो." असे कॅप्शनही त्याने या फोटोंना दिले आहे.

संबंधित बातम्या