Happy Birthday: अलका-नीरज च्या नात्याबद्दल कुटुंबीयांना दिला होता इशारा 

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

'चुरा के दिल मेरा', 'एक दो तीन' आणि 'टिप-टिप' बरसा पानी यासारखी असंख्य सुपरहिट गाणी देणारी बॉलिवूड गायिका अलका याग्निक सगळ्यांच्याच ओळखिची आहे. तिला खास ओळखिची गरज पडतच नाही

'चुरा के दिल मेरा', 'एक दो तीन' आणि 'टिप-टिप' बरसा पानी यासारखी असंख्य सुपरहिट गाणी देणारी बॉलिवूड गायिका अलका याग्निक सगळ्यांच्याच ओळखिची आहे. तिला खास ओळखिची गरज पडतच नाही कारण तिने 90th चे विश्व तिच्या आवाजाने गाजवून टाकलं आहे. तीचा मधुर आवाजावर अजूनही लोकांच प्रेम आहे. अलकाची इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची एक ओळृख आहे. तीच्याकडे नाव आणि कीर्ति असूनही, तीची जिवनशैली अगदी साधी आणि सरळ आहे. प्रेम आणि लग्नानंतरही त्यांचे कौटुंबिक जीवन सामान्य जोडप्यांसारखे आहे. आज त्यांच्या 55 व्या वाढदिवशी आम्ही तुम्हाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अशाच काही बाबींबद्दल सांगणार आहे.

Ripped Jeans: कंगनाने घेतली रिपड जीन्स प्रकरणात उडी; सोबतच दिला फॅशन सल्ला 

 रेल्वे स्टेशनवर झाली भेट

अलका याग्निकची प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. 1986 मध्ये तिने प्रथमच तिचा नवरा नीरज कपूरला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर बघितले होते. या ठिकाणी त्याच्या प्रोमकथेला सुरवात झाली होती. त्यावेळी अलका तीच्या आईबरोबर ट्रेनने काही कामानिमित्त दिल्लीला गेली होती. तेव्हा तीच्या आईचा मैत्रिणीचा पुतण्या नीरज स्टेशनवर त्यांना घेण्यास आला होता.

नीरज पायजामात स्टेशनवरआले होते 

एका मुलाखतीत अलका याग्निकने सांगितले की त्यांची गाडी सकाळी स्टेशनवर आली. होती आणि नीरज त्यांना आणि त्यांच्या आईला पायजामा घालून स्टेशनवर घ्यायला आले होते. या लूकमध्ये त्याला पाहून अलका चक्क आश्चर्यचकित झाली होती. अशा प्रकारे कोणी कसे येऊ शकते याबद्दल तीला आश्चर्य वाटले होते. अलकाला पहिल्यांदा पाहताना नीरजला वाटले की ही किती ग्लॅमरस आहे. एवढ्या सकाळी देखील तीने स्वत:ला पूर्णपणे मेंनटेन ठेवले आहे.

दोन वर्षे टिकली मैत्री

अलका आणि नीरजचे नाते स्टेशनपासून सुरू झाले. हळू हळू ते मित्र झाले. बिजनेस च्या संदर्भात नीरज जेव्हा जेव्हा मुंबईला जायचा तेव्हा तो अलकाच्या घरी जायचा. अशाप्रकारे, दोघांची दोन वर्षे मैत्री टिकली. यानंतर, त्यांनी आपले संबंध पुढे वाडविण्याचा विचार केला. 198 8 मध्ये त्यांनी आपल्या लग्नाबद्दल त्याच्या पालकांशी चर्चा केली.

या नात्याबद्दल कुटुंबीयांना दिला होता इशारा 

जेव्हा अलका आणि नीरज यांनी आपल्या लग्नाची इच्छा आपल्या कुटुंबियांना सांगितली तेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांना त्यांच्या संबंधाबद्दल कल्पना  दिली होती. दोघांनाही आपल्या करिअरमध्ये पुढे जायचे आहे हे दोघांनाही माहित होते आणि दोघेही खूप दूर राहत होते. अशा परिस्थितीत लॉंग डिस्टेंस रिलेशनशिप ठेवणे सोपे नाही.अशा परिस्थितीत लग्न मोडण्याची भीती जास्त असते असे असूनही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि शेवटी १९८९ णध्ये त्यांचे लग्न झाले.

कामाच्या संबंधात अलका मुंबईत राहत आहे. तर निरज शिलाँगमधील व्यवसाय पाहतो. लग्नाच्या एका वर्षाच्या आतच हे दोघेही मुलाचे पालक बनले. तेव्हापासून दोघांनीही आपल्या करियरला महत्त्व दिले आहे. ते एकमेकांना वारंवार भेटत राहतात. मात्र ते सामान्य जोडप्यांप्रमाणे एकत्र राहत नाहीत. लॉंग डिस्टेंस असूनही, ते एकमेकांना चांगले समजून घेतात. म्हणूनच एकमेकांपासून लांब असूनही ते एकमेकांशी जुळले आहेत, आणि आपल्या आयुष्यात आनंदी आहेत.

संबंधित बातम्या