Happy Birthday: अरिजीतच्या दुसऱ्या लग्नाची स्पेशल गोष्ट

Happy Birthday: अरिजीतच्या दुसऱ्या लग्नाची स्पेशल गोष्ट
Happy Birthday Arijit Singh married for the second time to his school crush she was the mother of one child

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक तरूणांच्या मनावर आपल्या आवाजाची छाप सोडणारा दर्दी सिंगर अरिजीत सिंह (Arijit Singh) आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे. अरिजीतने आपल्या मन मोहून घेणाऱ्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे. त्याच्या गाण्यांना देशभरातील आणि परदेशातील चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. पण ज्या अरिजीत च्या आवाजाने लोकांना प्रेमात पाडलयं तो अरिजात कुणाच्या प्रेमात पडला होता हे तुम्हाला माहिती आहे का? त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे, अरिजित सिंगने दोन विवाह केले आहेत.(Happy Birthday Arijit Singh married for the second time to his school crush she was the mother of one child)

अरिजीत सिंगचे पहिले लग्न रूपरेखा बॅनर्जी सोबत झाले होते. या दोघांची भेट फेम गुरुकुल या रियॅलिटी शोमध्ये झाली होती. हा शो 2013 मध्ये आला होता. पण या दोघांचे लग्न फार काळ टिकले नाही. ते एका वर्षातच एकमेकांपासून वेगळे झाले.

तिला एका मुलासह अरिजीतने स्विकारले

अरिजीत सिंगने दुसरे लग्न त्याच्या शाळेतील मैत्रीणीसोबत केले जी एका मुलाची आई होती. अरिजीतने आपल्या लग्नाची गोष्ट कितीतरी वर्ष मिडियापासून लपवून ठेवली होती. पण ज्या दिवशी त्याने आपल्या सोशल मीडियावर पत्नीबरोबर एक फोटो शेअर केला, त्या दिवशी सर्वांना त्याच्या प्रेमाबद्दल आणि लग्नाविषयी त्याच्या फॅन्सला माहिती झाले. गायक अरिजीत सिंगने आपल्या बालपणाची क्रश कोयल रॉयशी (Koyal Roy) दुसऱ्यांदा लग्न केले. मीडिया रिपोर्टनुसार, कोयलचे पहिले लग्न फार काळ टिकले नाही. यामुळे तिचा घटस्फोट झाला आणि तिने अरिजीत सिंगसोबत लग्न केले तेव्हा तिला एका मुलासह अरिजीतने स्विकारले.

लग्नासाठी मी स्वत: प्रपोज केलं होत

कोयलशी असलेल्या त्याच्या नात्याबद्दल बोलताना अरिजित सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की “आम्हाला दोघांनाही चित्रपट खूप आवडतात. लहानपणापासूनच आमच्या दोघांची एकत्र चित्रपट बनवायची आणि पुस्तकं लिहायाची अशा इच्छा होती. कोयलला लग्नासाठी मी स्वत: प्रपोज केलं होत."
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वेळी अरिजीत सिंग यांनी 'सा' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, या चित्रपटाची संपूर्ण कथा अरिजित आणि कोयल यांनी लिहिली होती. कोयल त्याच्या प्रत्येक नवीन प्रकल्पात मदत करते. तीला पुस्तक वाचाण्याची खूप आवड आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्येही रस आहे, असे अरिजितने सांगितले होते.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com