Happy Birthday: करण जोहर आणि एकता कपूरमधला कॉमन फॅक्ट तुम्हाला माहिती आहे का?

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 25 मे 2021

बॉलिवूडचे(Bollywood) सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर(Karan Johar ) यांचा आज वाढदिवस आहे. करणच्या आयुष्याशी संबंधित बर्‍याच गोष्टी लोकांना माहिती आहेत. त्याने आपल्या 'द अनसुटेबल बॉय'(The Unsuitable Boy) या पुस्तकात बरेच काही सांगितले आहे.

Happy Birthday: बॉलिवूडचे(Bollywood) सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर(Karan Johar ) यांचा आज वाढदिवस आहे. करणच्या आयुष्याशी संबंधित बर्‍याच गोष्टी लोकांना माहिती आहेत. त्याने आपल्या 'द अनसुटेबल बॉय'(The Unsuitable Boy) या पुस्तकात बरेच काही सांगितले आहे. करण एकल पालक आहे. सरोगसी मुळे वडील बनले आहे. त्याने लग्न केलेले नाही, जरी त्याने अनेकवेळा सांगितले आहे की त्याला लहानपणापासूनच ट्विंकल खन्नावर आवडते. करण जोहरचे नाव आणखी एका व्यक्तीशी जोडले गेले आहे ते म्हणजे एकता कपूर(Ekta Kapoor). एक काळ असा होता जेव्हा त्यांच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत होती.(Happy Birthday Do you know the common fact between Karan Johar and Ekta Kapoor)

बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयसोबत सामंथाला करायचाय रोमांन्स 

दोघेही सरोगसी पालक आहेत
करण जोहर आणि एकता कपूर त्यांच्या क्षेत्रात खूप यशस्वी आहेत. या दोघांमध्ये बरीच समानता आहेत, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एकता देखील एकल पालक आहे. करणसारख्या सरोगेसीची ती आई आहे. करणच्या मुलांचे नाव यश आणि रुही आहे. एकताच्या मुलाचे नाव रवी आहे.

अक्षय कुमारने लावला सूर्यवंशी आणि बेल बॉटम च्या अफवांवर पूर्णविराम 

वडिलांच्या नावावर मुलाचे नाव
मुलांच्या सरोगसीपासून ते त्यांच्या नावापर्यंत एक गोष्ट कॉमन आहे. एकताने आपल्या वडिलांच्या नावावर मुलाचे नाव ठेवले आहे. त्याचवेळी करणने आपल्या वडिलांचे नाव यश जोहरच्या नावावर आपल्या मुलाचे नाव यश देखील ठेवले आहे. त्याच्या मुलीचे नाव रुही आहे जे त्याच्या आईच्या नावाच्या उलट आहे. करणच्या आईचे नाव हीरू आहे.

दोघांचाही 'क' अक्षरांशी जवळचा संबध आहे
खूप दिवसांपूर्वी एकता कपूर आणि करण जोहरच्या लग्नाच्या बातम्या आल्या. या अहवालांवर करणने सांगितले होते की त्याने एकताशी लग्न केले तर त्याची आई खूप आनंदी होईल. यामागे करणने एक मनोरंजक कारण दिले होते. तो म्हणाला होता की, माझी आई माझ्या लग्नामुळे खुश होणार नाही परंतु मालिकांमधे काय घडणार आहे हे तिला अगोदरच समजेल. 

Radhe: चित्रपटाच्या पायरसीवरून दिल्ली उच्च न्यायलायचे व्हॉट्सअ‍ॅपला कारवाईचे आदेश 

एकता प्रपोजल च्या प्रतीक्षेत
त्याचवेळी जेव्हा एकताला विचारले गेले की ती करण जोहरशी लग्न करणार आहे का? तिने विनोदपणे म्हटले की, करणच्या प्रपोज करण्याची मी वाट पहात आहे. मात्र, करणने एका मुलाखती दरम्यान लोकांचा गैरसमज दूर केला होता. त्याने सांगितले होते की, त्याच्या आणि एकताच्या लग्नाच्या बातम्या सलमान खानच्या वर्जिन प्रमाणेच खऱ्या आहेत.

संबंधित बातम्या