Happy Birthday: स्वराच्या लाइफमधील सर्वात मोठ्या कॉन्ट्रोवर्सीज माहितीयेत का?

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

प्रवाहाच्या विरूध्द केलेल्या विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या स्वरा भास्करचा आज वाढदिवस आहे. जेव्हा स्वराला तिच्या वाढदिवसाचा काय प्लॅन असं विचारले असता, ती म्हणाली, ती गोव्यात शूट करणार असून, तिला या चित्रपटाच्या सेटवर जाणे आवडत असल्याने तिच्यासाठी तेवढे जास्त आनंदाची गोष्ट आहे.

Happy Birthday Swara: प्रवाहाच्या विरूध्द केलेल्या विधानांमुळे चर्चेत राहिलेल्या स्वरा भास्करचा आज वाढदिवस आहे. स्वरा भास्कर यावेळी तिचा 32 वा वाढदिवस साजरा करणार आहे. स्वराने बॉलिवूडमध्ये करिअरची सुरूवात गुजारिश या चित्रपटातून केली होती. यानंतर स्वराने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आणि विशेष म्हणजे स्वरने आपल्या बर्‍याच चित्रपटांमध्ये डी-ग्लॅम पात्र साकारले असून स्वराने आपल्या प्रत्येक पात्रातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्वराची खास बाब म्हणजे ती प्रत्येक विषयावर उघडपणे बोलते. बर्‍याच वेळा ती या कारणामुळे वादात देखिल सापडते. तर स्वराची आतापर्यंतची सर्वात मोठ्या कॉन्ट्रोवर्सीज बद्दल जाणून घेवू. 

वीरा दि वेडिंग चित्रपटामधील स्वरा भास्करचा मास्टरबेशन सीन चर्चेत आला होता. या सिनवर बरेच सिन क्रियेट झाले होते.  लोकांचे म्हणणे होते की, हे स्रर्व आपल्या कल्चरच्या विरूध्द आहे. त्यासाठी स्वरालाही ट्रोल केलं गेलं होतं. पण स्वराला असे होणार हे आधिच माहिती होते. या सिनबद्दल आपल्याला बर्‍याच नकारात्मक प्रतिक्रिया मिळतील हे तीला आधीपासूनच माहित होते, असे ती म्हणाली.

पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी स्वराने  चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना एक ओपन लेटर लिहिले होते. चित्रपटातील जौहार सिनबद्दल त्यांनी असे वादग्रस्त विधान केले होते ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. पुरुषाला फक्त स्त्रीचे शरीर हवे आहे का आणि जर स्त्रीला ही मागणी पूर्ण करायची नसेल तर तिला मराव लागणार. स्त्रियांना मरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही का? असे प्रश्न स्वराने उपस्थित केले होते. 

वीरे दी वेडिंग चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान स्वराने पाकिस्तानला अपयशी देस म्हटले होते. तिच्या या वक्तव्यानंतर तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तिने एका शो दरम्यान पाकिस्तानला सर्वोत्कृष्ट देश म्हटले होते. 

स्वाराने एकदा भारतीय सैन्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सोशल मीडियावरील वापरकर्त्यांनी तीची खिल्ली उडविली आणि तीला या मुद्यावरून खूप ट्रोलही केले होते. या ट्विटद्वारे स्वराने मॉब लिंचिंग आणि हॉरर किलिंगसारख्या मुद्द्यांबाबत आपले मत व्यक्त केले होते.

शक्तीमान! अनुष्का शर्माने विराट कोहलीला हवेत उचलले 

* जेव्हा स्वराला तिच्या वाढदिवसाचा काय प्लॅन असं विचारले असता, ती म्हणाली, ती गोव्यात शूट करणार असून, तिला या चित्रपटाच्या सेटवर जाणे आवडत असल्याने तिच्यासाठी तेवढे जास्त आनंदाची गोष्ट आहे. स्वरा पुढे म्हणाली की तिला यंदा बिकीनी बॉडी बनवायाची आहे.  स्वराच्या लग्नाविषयी विचारले असता  "तुम्ही लग्न तेव्हा करात जेव्हा तुम्हाला योग्य व्यक्ती मिळतो, असा योग्य मिळाल्याच याच वर्षी लग्न होवू सकतं, असे स्वरा म्हणाली.

Happy Birthday Allu Arjun: अल्लु अर्जूनच्या लग्नाची गोष्ट; वडिलांना पाठवंल होतं तिच्या घरी 

स्वरा शेवटचा नेटफ्लिक्स कॉमेडी वेब शो भाग बीनी भाग मध्ये दिसली आहे. या शोमध्ये स्वराने स्टँड अप कॉमेडियनची भूमिका केली होती. आता स्वरा शीर कोरमा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात स्वरासोबत दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट एलजीबीटीक्यूआयएवर (LGBTQIA) आधारित असेल.

संबंधित बातम्या