Birth Anniversary: दोन दशकानंतर 'चेन्नई एक्स्प्रेस' मधून केली होती बाल सुब्रमण्यम यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जून 2021

SP Balasubrahmanyam Birth Anniversary:भारतीय चित्रपटसृष्टीतील(Bollywood) प्रसिद्ध संगीतकार श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam)आणि त्याचा जादूई आवाज चाहत्यांना कधीही विसरता येणार नाही.

SP Balasubrahmanyam Birth Anniversary:भारतीय चित्रपटसृष्टीतील(Bollywood) प्रसिद्ध संगीतकार श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam)आणि त्याचा जादूई आवाज चाहत्यांना कधीही विसरता येणार नाही. आज या दिवंगत गायकाचा(Singer) वाढदिवस आहे. 4 जून 1946 रोजी जन्मलेले बालसुब्रमण्यम संगीत दिग्दर्शक, गायक आणि चित्रपट निर्माता होते. एस पी यांच्या आवाजाने चाहत्यांना असा दिलासा मिळाला होता की, कोरोनाने संक्रमित झाल्यानंतर एसपी यांनी जेव्हा या जगाचा निरोप घेतला तेव्हा कित्येक चाहत्यांचे डोळे पानावले होते.

आंध्र प्रदेशात जन्मलेल्या बालसुब्रमण्यम यांच्या वडीलांचा नाटय़विश्वाशी चांगलाच संबंध होता, परंतु बालसुब्रमण्यम यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. मोठे झाल्यावर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि अभ्यास करतानाच संगीताशी जुळले गेले. बालसुब्रमण्यम यांनी पहिल्यांदा तेलगू संस्कृती असोसिएशनची संगीत स्पर्धा जिंकली होती.

बॉलिवूडला अनलॉक करण्याची FWICE ची मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहीले पत्र

या प्रसिद्द गायकाला 6 वेळा सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की एस पी यांनी आपल्या कारकीर्दीत वेगवेगळ्या भाषांमध्ये चाळीस हजाराहून अधिक गाणी गायली आहे. आज आपण त्यांच्या काही दुर्मिळ गाण्यांची ओळख करुन घेणार आहोत.

1966 साली तेलुगू चित्रपटातील गाण्यासाठी बालसुब्रमण्यमला पहिला ब्रेक मिळाला  होता. या गाण्यानंतर, केवळ 8 दिवसात, त्यांना दुसर्‍या चित्रपटासाठी ऑफर आली आणि नंतर त्यांना गाण्यांच्या ऑफरची लाईन लागली.  आणि मग झालं असं की 198१  च्या सुमारास ते फक्त 12-12 तास चित्रपटांसाठी गाणीच गायचे.

Wedding Anniversary: लंडनला जाण्यासाठी दुसऱ्याच दिवशी बीग बीने केलं होतं लग्न

सलमानचा खास आवाज

1989 मध्ये बालसुब्रमण्यम यांना हिंदी चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आणि ते सलमान खानच्या सुपरहिट फिल्म 'मैने प्यार किया' मध्ये गायला आले. या चित्रपटाच्या गाण्यांमुळे ते हिंदी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध झाले आणि पडद्यावरील गाण्यांमध्ये ते सलमान खानचा आवाज बनले. आणि त्यानंतर त्यांनी सलमानच्या कितीतरी चित्रपटांच्या गीतासाठी आवाज दिला.

हिंदी चित्रपटसृष्टीपासून जवळजवळ दोन दशक गायनापासून दुर राहिल्यानंतर बालसुब्रमण्यम 'चेन्नई एक्स्प्रेस' मधून परत आले होते. त्यांनी या चित्रपटाचा टायटल ट्रॅक गायला. हे गाणेही खूप प्रसिद्ध झाले. जेव्हा  सुब्रमण्यम यांनी सलमानसाठी गाणी गाणे बंद केले तेव्हा बरेच प्रश्न उपस्थित झाले होते, तेव्हा अभिनेता सलमानने, आता त्याचा आवाज मला शोभत नाही कारण काळानुसार त्याचा आवाजात बदल झाला आहे आणि माझ्या पर्सनॅलिटिमध्येही बदल झाला आहे असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र आजही संगीत प्रेमी बालसुब्रमण्यम यांच्या गाण्यांतून आनंद व्यक्त करतात. आणि SP यांची आठवण काढतात.

संबंधित बातम्या