Happy Birthday Nawazuddin Siddiqui: यांचे पाच प्रसिद्ध डायलॉग

Happy Birthday Nawanzuddin Siddiqui
Happy Birthday Nawanzuddin Siddiqui

Happy Birthday Nawanzuddin siddiqui: बॉलीवुडमध्ये यश साहजासहजी  मिळणे शक्य नाही. खासकरून हे त्यांच्यासाठी कठीण आहे, ज्याना वळोवेळी परीक्षा द्यावी लागते. परंतु काही  जिद्दी लोकांनी बॉलिवूडचा स्केल तोडला आणि आपली जागा बॉलीवुडमध्ये मिळवली आहे. बॉलिवूडमध्ये असे काही अभिनेते आहेत, जे फक्त आपल्या अभिनयासाठीच ओळखले जातात. या यादीमध्ये सर्वातवर नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे नाव आहे. ते कोणताही अभिनय करताना स्व:ताला त्या पात्रात  झोकून देतात. या वैशिष्टयमुळेच नवाझला बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. 19 मे, 1974 रोजी जन्मलेल्या नवाजुद्दीनच्या अथक परिश्रमाने त्यांना मोट्या परदयावर जागा मिळाली आहे. नवाजुद्दीनने 19 वर्षापूर्वीच आमिर खानच्या ‘सरफरोश’ चित्रपटाद्वारे आपल्या कामाची सुरूवात केली होती. या चित्रपटात नवाजने एक लहान भूमिका साकारली होती. परंतु त्यांना ओळख अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपुर' या चित्रपटामधून मिळाली. तेव्हा वाढदिवसा जाणून घेऊया त्यांचे खास पाच डायलॉग. (Happy Birthday Nawazuddin Siddiqui: Five super-hit dialogues of your favourite actor)

1)"नफरत बडी आसानी से बिक जाती है .. लेकिन मोहब्बत? "

नवांजुद्दीन यांचा हा डायलॉग 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या "बाजरंगी भाईजान" या चित्रपटातील आहे. या चित्रपटात त्यांनी एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. या जगात प्रेमापेक्षा द्वेष सहजपणे पसरविल्या  जातो. असा या डायलॉगचा अर्थ होतो. 

2) "कभी कभी लगता है की अपूनहीच भगवान है"

"सिक्रेड गेम्स" ही नेटफ्लिक्स वेब सिरीज आहे. ही वेब सिरिज 2018 रोजी रिलीज झाली होती. ही मालिका विक्रम चंद्र यांच्या 2006 च्या 'सिक्रेड गेम्स' या कादंबरीवर आधारित आहे. ही थ्रिलर सिरिज अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवणे यांनी दिग्दर्शित केली आहे. हा डायलॉग नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा आहे. हा डायलॉग खूप प्रसिद्ध झाला आहे. 

3) "तुमको याद कर कर हाथ दुख गया हमारा"

"गॅंग ऑफ वासेपुर: भाग 2 " मधील हा नवाजुद्दीनचा डायलॉग प्रचंड प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी या चित्रपटामध्ये फैजल खानची भूमिका साकार केली आहे. 2012 मधील गुन्हेगारीवर आधारित हा चित्रपट आहे. अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शित केला आहे. गँग्स ऑफ वासेपुर या दुसऱ्या भागात धनबाद, आणि झारखंडमधील कोळसा माफिया यांच्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्ष, राजकारण आणि सूड या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलेले आहे . 

4) "मैं वही लिखता हूं .. जो जानता हूं .. जो देखता हूं .. मैं तो बस अपनी कहानीया को एक आईंना  समझता हूं .. जिस्में तुम्हें आप को देख पाते !"

हा डायलॉग "मंटो" या चित्रपटातील आहे. हा चित्रपट नंदिता दास यांनी दिग्दर्शित केला आहे. हा एक भारतीय चरित्र चित्रपट आहे. हा चित्रपट 2018 रोजी प्रदर्शित झाला होता.  

5) "मेरी अम्मी केहती है कभी कभी गलत ट्रेन भी सही जगह पहूंचा देती है"

हा डायलॉग "द लंच बॉक्स" या चित्रपटामधील आहे. हा चित्रपट रिटेशा बत्रा यांनी दिग्दर्शित केला आहे. हा एक रोमॅंटिक चित्रपट आहे.  हा चित्रपट एकाच वेळी अनेक सिनेमगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. ते म्हणजे यूटीव्ही मोशन पिक्चर्स , धर्मा प्रोडक्शन्स, शीख्या एंटरटेनमेंट, डेर मोशन पिक्चर्स, एनएफडीसी (भारत), रोह फिल्म्स (जर्मनी), एएसएपी फिल्म्स (फ्रान्स) आणि सिने मोझिक (युनायटेड स्टेट्स). नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली  आहे. हा चित्रपट 2013 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये "द लंच बॉक्स" चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 2013 मध्ये  टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 20 सप्टेंबर 2013 रोजी भारत, यूएसए आणि यूके मध्ये प्रदर्शित झाला होता. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com