Happy Birthday Allu Arjun: अल्लु अर्जूनच्या लग्नाची गोष्ट; वडिलांना पाठवंल होतं तिच्या घरी

Happy Birthday Allu Arjun: अल्लु अर्जूनच्या लग्नाची गोष्ट; वडिलांना पाठवंल होतं तिच्या घरी
Happy Birthday Sneha and Allu Arjun is romantic Perfect Couple

अल्लू अर्जुन (Allu Arjun) हा टॉलीवूड इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. अल्लूची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तो कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. परंतु अल्लुच्या मनावर एकच व्यक्ती राज्य करते आणि ती म्हणजे स्नेहा रेड्डी (Sneha Reddy). अल्लू आणि स्नेहाची जोडी एक परफेक्ट जोडी आहे. आज, अल्लूच्या वाढदिवशी तुम्हाला अल्लू आणि स्नेहाची प्रेमकथा सांगतोय. एका मित्राच्या लग्नात अल्लू आणि स्नेहाची पहिली भेट अमेरिकेत झाली होती. अल्लू एक अभिनेता आहे हे स्नेहाला ठाऊक होतं, पण तीने कधीच त्याचा चित्रपट पाहिला नव्हता.

पहिल्या भेटीत या दोघांनीही एकमेकांची मने जिंकली होती. दोघेही बोलू लागले भेटू लागले. आधी दोघांची मैत्री झाली आणि मग हळूहळू या मैत्रीच प्रेमात रूपांतर झाल. स्नेहा हैदराबादच्या लोकप्रिय व्यावसायिकाची मुलगी होती. काही वर्षांच्या नात्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यानंतर अल्लूने आपल्या वडिलांना स्नेहाच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेवून जायला सांगितलं अल्लूचे वडील स्नेहाच्या घरी गेले आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलले. पण स्नेहाच्या वडिलांनी या लग्नाला नकार दिला.

दोघांनी एकत्र राहण्याचा निर्धार केला होता
स्नेहाच्या वडिलांनी लग्नास नकार दिला असेल, परंतु स्नेहा आणि अल्लूला एकमेकांना सोडायचं नव्हतं. त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्धार केला होता. स्नेहाच्या कुटूंबाला समजावण्याचा प्रयत्न दोघांनीही केला आणि अखेर त्यांनी आपल्या कूटूबीयांची मने जिंकली. यानंतर 6 मार्च 2011 रोजी या दोघांनी थाटात लग्न केले. या दोघांविषयी खास गोष्ट म्हणजे स्नेहा एंटरटेनमेंट इंडस्ट्री नसली तरीही ती अल्लूच्या करीअरला चांगल्या प्रकारे समजून घेते आणि त्याला समर्थन देते.

त्याचबरोबर, अल्लू सद्धा एका प्रसिद्धीचा एक भाग असला तरीही त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्यावर कधीही त्याचा परिणाम होऊ दिला नाही. त्याला स्नेहा खूप आवडते. या दोघांना अयान आणि अरहा ही दोन मुले आहेत. अल्लूची एक हॅप्पी फॅमिली आहे.

अल्लूच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर आता तो पुष्पा या चित्रपटात दिसणार आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला. टीझरमध्ये अल्लू अर्जुन फूल अ‍ॅक्शन मुडमध्ये दिसत आहे. या सिनेमात अल्लूला एक वेगळी स्टाईल मिळत आहे, जी त्याच्या आधीच्या सर्व पात्रांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com