Happy Birthday: सोहेल खान उत्तम दिग्दर्शक सह अभिनेता

सोहेल खान यांचा जन्म 20 डिसेंबर 1970 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला होता.
सोहेल खान

सोहेल खान

Dainik Gomantak

सोहेल खान यांनी आयुष्याचा अर्धा टप्पा 50 शी पार केला आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटवणाऱ्या सोहेल खानला आज कोणत्याही नवीन परिचयाची गरज नाही.

मात्र, सोहेल आता चित्रपट करण्यात फारसा रस घेत नाहीत. त्यांनी त्यांच्या चित्रपट (Film) कारकिर्दीत नायक म्हणूनही काम केले. होय, त्यांचा मोठा भाऊ सलमान खान ज्या पद्धतीने हिरो म्हणून ओळखले आणि लोकप्रिय झाले आहेत. तसेच सोहेल सुद्धा लोकप्रिय झाले आहेत.

त्यांच्या चित्रपटांमध्ये सलमान हा एकमेव हिरो आहे. सोहेल खान हे आनंदी स्वभावाचे आहेत. सोनी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या 'कॉमेडी सर्कस' या शोलाही त्यांनी जज म्हणून काम पाहिजे.

50 वा वाढदिवस

आज सोहेल खानचा (Sohail Khan) यांचा 50 वा वाढदिवस आहे. सोहेल खान यांचा जन्म 20 डिसेंबर 1970 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला होता.

प्रसिद्ध बॉलिवूड (Bollywood) लेखक सलीम खान यांचा ते तिसरा मुलगा आहे. त्याच्या आईचे नाव सलमा खान आहे. त्यांना सलमान आणि अरबाज हे दोन भाऊ आणि अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान शर्मा या दोन बहिणी आहेत.

<div class="paragraphs"><p>सोहेल खान</p></div>
जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांचा आज 92 वा वाढदिवस

शिक्षण

सोहेल खानने यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण (Education) त्याचा भाऊ सलमान खानसोबत सिंधिया स्कूल ग्वाल्हेरमधून केले. तर सोहेल खानचे लग्न सीमा सचदेवाशी झाले असून त्यांना योहान आणि निर्वान ही दोन मुले आहेत.

फिल्मी करिअरवर

1997 मध्ये 'औजार' या सिनेमातून त्याने निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली.

सोहेल खानने 2002 साली 'मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात अभिनयासोबतच सोहेल खान यांनी ने कथा लिहिली, दिग्दर्शन आणि निर्मिती केली.

एक अभिनेता म्हणून त्याचा 'मैने प्यार क्यूं किया' हा एक यशस्वी चित्रपट होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. या चित्रपटानंतर सोहेलने 'आर्यन' आणि 'पार्टनर' सारखे चित्रपट केले.

2010 मध्ये सोहेल खान मोठ्या भावासोबत 'वीर' चित्रपटात दिसले होते. 2014 मध्ये पुन्हा दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि 'जय हो' चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटातही सलमान खान मुख्य भूमिकेत होते आणि त्याच्या विरुद्ध डेझी शाह होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com