Happy Birthday Mohanlal: साऊथ सुपरस्टार मोहनलाल चित्रपटात येण्यापूर्वी होता रेसलर

साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी
Happy Birthday Mohanlal: साऊथ सुपरस्टार मोहनलाल चित्रपटात येण्यापूर्वी होता रेसलर
MohanlalDainik Gomantak

साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांचा आज 62 वा वाढदिवस साजरा करत आहे. मोहनलाल हे मल्याळम चित्रपटांचे प्रसिद्ध अभिनेते असून त्यांचे पूर्ण नाव मोहनलाल विश्वनाथ नायर आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत. (Happy Birthday South Superstar Mohanlal)

मोहनलाल (Mohanlal) यांचा जन्म 21 मे 1960 रोजी केरळमधील एलांथूर येथे झाला. साऊथ इंडस्ट्रीमध्ये मोहनलाल यांची फॅन फॉलोइंग खूप प्रचंड आहे. मोहनलाल यांनी 1980 मध्ये 'मंजिल विरंजा पुक्कल' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

मोहनलाल एक प्रतिभावान अभिनेता आहे. एक अनुभवी अभिनेते असण्यासोबतच, मोहनलाल एक विपुल निर्माता, गायक (Singer) आणि थिएटर कलाकार देखील आहेत. अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी ते कुस्तीपटू होते. ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत असले तरी मोहनलाल यांनी 1977-78 मध्ये केरळ राज्य कुस्ती चॅम्पियनशिप ट्रॉफी देखील जिंकली. मोहनलाल आज करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 365 कोटी रुपये आहे.

Mohanlal
आर. माधवनने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

मोहनलाल यांचे उटीला घर असून यांचा दुबईतील (Dubai) बुर्ज खलिफा येथे स्वतःचा फ्लॅटही आहे. बुर्ज खलिफा इमारतीच्या 29 व्या मजल्यावर त्यांचे घर आहे. याशिवाय त्यांचे अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहे. मोहनलाल यांच्याकडे चैनीच्या वस्तूंचाही मोठा संग्रह आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com